News Flash

संजय दत्तच्या नव्या केशरचनेचे रहस्य

पार्टीतील संजयच्या उपस्थितीबरोबरच त्याची अनोखी केशरचना अनेकांचे लक्षवेधून घेत आहे.

संजय दत्त आपल्या नव्या केशरचनेची झलक दाखविताना.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या सुटकेमुळे चाहत्यांप्रमाणेच त्याच्या मित्र परिवारातदेखील आनंदाचे वातावरण आहे. सध्या तो परिवारासोबत अनेक पार्ट्यांना उपस्थिती लावताना दिसत आहे. पार्टीतील संजयच्या उपस्थितीबरोबरच त्याची अनोखी केशरचना अनेकांचे लक्षवेधून घेत आहे. संजयदेखील आपली ही सोनेरी पोनीटेल मिरवताना नजरेस पडतो. तुरुंगवासाची शिक्षा भोगून आलेल्या संजय दत्तमध्ये शारीरिक आणि मानसिक स्तरावर चांगला बदल पाहायला मिळत असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजते. सोनेरी पोनीटेलमुळे संजय दत्तचे व्यक्तिमत्व उठून दिसत आहे. तुरुंगात असताना मिश्राजी नावाची व्यक्ती आपले केस कापत असे. त्यांनीच आपल्याला ही सोनेरी पोनीटेल स्वरुपातील हेअरस्टाइल दिल्याची माहिती नव्या केशरचनेची झलक दाखवत त्याने दिली.
व्यावसायिक पातळीवर बोलताना आपण दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदच्या एका चित्रपटात काम करत असून, विधू विनोद चोप्रांबरोबर ‘मुन्नाभाई ३’ व्यतिरिक्त आणखी एक चित्रपट करत असल्याचे त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2016 5:59 pm

Web Title: sanjay dutt reveals secret behind his new hairstyle
टॅग : Bollywood,Sanjay Dutt
Next Stories
1 चुकीचे उच्चार करून राष्ट्रगीत म्हटल्याबद्दल अमिताभ बच्चन यांच्याविरुद्ध तक्रार
2 TOIFA award: टोयफा पुरस्काराला कपड्यांमुळे झाली सलमानची पंचाईत!
3 आराध्याच्या ‘अॅन्युअल डे’ला पोहचले अभिषेक-ऐश्वर्या
Just Now!
X