पॉलिटीकल ड्रामा म्हणून चर्चेत असलेला प्रस्थानम हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या सरकार या चित्रपटावरुन कॉपी केला असल्याचे आरोप केले जात आहेत. या आरोपांचे अभिनेता संजय दत्त याने खंडन केले आहे. संजय दत्त अभिनीत प्रस्थानम या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून अनेकांनी संजय दत्तच्या अभिनयाची प्रचंड स्तुती केली. मात्र ट्रेलरमधील काही दृष्यांवर चाहत्यांनी आक्षेप घेत हा चित्रपट कॉपी केल्याचा आरोप केला आहे.

हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झालेल्या प्रस्थानम या तामिळ चित्रपटाचा रिमेक व्हर्जिन आहे. हा चित्रपटाचे कथानक राजकीय विषयावर आधारीत आहे. यांत संजय दत्त एका लोकप्रिय नेत्याच्या भूमिकेत आहे. तसेच त्याला दोन मुले आहेत. यातील एक त्याचा सावत्र मुलगा आहे. तो आपल्या सावत्र मुलाला आपला राजकीय वारसा सोपवू इच्छित आहे. दरम्यान सत्तेसाठी दोन भाऊ व वडिलांमध्ये होणाऱ्या राजकीय वादावर हा चित्रपट आधारीत आहे. असेच काहीसे कथानक सरकार या चित्रपटाचे होते. त्यामुळे प्रस्थानमचा ट्रेलर पाहून वारंवार सरकारची आठवण येत असल्याचे काही चाहत्यांनी म्हटले आहे.

दरम्यान या आरोपांचे स्वत: संजय दत्तने एका मुलाखती दरम्यान खंडन केले. “हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झालेल्या प्रस्थानम या तामिळ चित्रपटाचा रिमेक व्हर्जिन आहे. यातील संपूर्ण कथानक व दृष्ये या चित्रपटावरच आधारीत आहेत. तसेच हा कोणत्याही बॉलिवूड चित्रपटावरुन कॉपी केला गेलेला नाही. अशा शब्दात संजय दत्तने आरोपांवरील स्पष्टीकरण दिले.

खरे पाहता राम गोपाल वर्मा यांचा सरकार हा चित्रपट देखील १९७२ साली प्रदर्शीत झालेल्या सुपरहिट गॉडफादर या चित्रपटाची कॉपी आहे. सिनेइतिहासातील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाची संकल्पना उचलुन आजवर शेकडो चित्रपट जगभरात तयार केले गेले आहेत. आणि त्यातच आता प्रस्थानमची देखील भर पडली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.