News Flash

मान्यता दत्तच्या वाढदिवशी संजय दत्तने शेअर केला रोमॅण्टिक व्हिडीओ; म्हणाला, ‘मेरी दुनिया है तुझमें..’

संजय दत्तने आपल्या रोमॅण्टिक अंदाजात पत्नी मान्यता दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इतकंच नव्हे तर संजय दत्तने तिच्यासाठी एक इमोशनल पोस्ट देखील लिहिलीय.

बॉलिवूड अभिनेत संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करतेय. पत्नी मान्यता दत्तचा वाढदिवस आणखी स्पेशल बनवण्यासाठी संजय दत्तने कोणत्याच प्रकारची कमी भासवू दिली नाही. संजय दत्तने आपल्या रोमॅण्टिक अंदाजात पत्नी मान्यता दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नव्हे तर संजय दत्तने तिच्यासाठी एक इमोशनल पोस्ट देखील लिहिलीय.

बॉलिवूडमधला संजू बाबा हा फक्त त्याच्या चित्रपटातील दमदार अभिनयासाठीच नव्हे तर पर्सनल लाइफमुळे सुद्धा बराच चर्चेत येत असतो. संजय दत्त आणि मान्यता दत्तच्या जोडीला बॉलिवूडमधील एक ‘आयडल कपल’ मानलं जातं. मान्यता ही संजू बाबाची तिसरी पत्नी आहे. संजय दत्त आणि मान्यता दत्त या दोघांमधील बॉण्डिंगचं लोकं खूप कौतुक करतात. 2008 साली संजय दत्तने मान्यताशी लग्न केलं. संजय दत्तच्या प्रत्येक अडचणीत मान्यताने खंबीरपणे साथ दिली. पत्नी मान्यता दत्तला तिच्या वाढदिवशी संजय दत्तने अनोख सरप्राईज दिलंय.

संजय दत्तनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये संजय दत्त आणि मान्यता दत्त या दोघांमधील सुंदर फोटोज पहायला मिळतात. या व्हिडीओमध्ये बॅकग्राउंडला ‘मेरी दुनिया है तुझमे कहीं…’ हे गाणं ऐकायला मिळतं. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने मान्यतासाठी एक इमोशनल कॅप्शन देखील लिहिलीय. “तू माझ्या कुटुंबाचा पाया आहेस…माझ्या जीवनातील आशेचा किरण आहेस…तू माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहेस हे मी शब्दात सांगू शकणार नाही…हे तुला उत्तमरित्या माहितेय…माझी कायम साथ देण्यासाठी आणि कायम सोबत राहण्यासाठी खूप आभार….वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

अभिनेता संजय दत्त प्रत्येक वर्षी आपल्या पत्नी मान्यता दत्तला आपल्या अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो. मान्यता दत्तला बॉलिवूडमध्ये सुरूवातीला ‘सारा खान’च्या नावाने ओळखलं जात होतं. मान्यताला चित्रपटांमध्ये झळकणं खूप आवडतं. तिने यासाठी खूप कष्ट देखील घेतले होते. 2003 मध्ये, मन्यताला प्रकाश झाच्या ‘गंगाजल’ चित्रपटात एक आयटम साँग मिळालं आणि ती या गाण्यामुळे प्रसिद्ध झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 4:08 pm

Web Title: sanjay dutt shares romantic video on maanayata dutt birthday prp 93
Next Stories
1 अनुराग कश्यपवर झालेल्या आरोपांवर मुलगी आलियाने सोडलं मौन, म्हणाली…
2 ‘सिटी ऑफ ड्रिम्स २’चा ट्रेलर प्रदर्शित, पाहायला मिळणार सत्तेसाठी बाप-मुलीत सुरु असणारा लढा
3 “एकदा तरी स्वतः…” सिद्धार्थ चांदेकरची ‘ही’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Just Now!
X