लवकरच संजय दत्त, पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सडक २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले असून ते तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. आता या चित्रपटातील एक नवे गाणे प्रदर्शित झाले आहे.

या गाण्याचे नाव आहे दिल की पूरानी सडक. या गाण्यात संजय दत्त वेगळ्या अंदाजात पाहायला मिळतोय. गाण्याची सुरुवात ही पहिल्या ‘सडक’ चित्रपटातील संजय दत्त आणि पूजा भट्टच्या एका सीनने होते. हे गाणे समिध मुखर्जी आणि उर्वी यांनी कंपोज केले आहे. तसेच गाण्याचे बोल विजय विजवत यांनी हे गाणे लिहिले आहे. पण गाण्याला चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणे डिसलाइक मिळत आहेत.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

आणखी वाचा : ‘सडक २’च्या ट्रेलरला डिसलाइक पाहून पूजा भट्ट म्हणाली..

हे गाणे आतापर्यंत जवळपास ११ लाख लोकांनी पाहिले आहे. त्यातील १० हजार लोकांनी लाइक केले आहे तर २८ हजार लोकांनी डिसलाइक केले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलर प्रमाणेच गाणे प्रदर्शित होताच डिसलाइक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकराणानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा वाद पेटून उठला. त्यामुळे स्टारकिड्सवर जोरदार टीका झाली. यामध्ये सर्वाधिक टीका महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबीयांवर करण्यात आली होती. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी महेश भट्ट यांचा आगामी चित्रपट ‘सडक २’च्या ट्रेलवर डिसलाइकचा भडिमार केला असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच २४ तासांमध्ये यूट्यूबर सर्वाधिक डिसलाइक मिळालेला ठरला आहे.