शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमाची चर्चा सुरु आहे. २५ जानेवारी रोजी हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये देशभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी २३ जानेवारी रोजी बाळासाहेबांची ९३ वी जयंती आहे. याचनिमित्ताने कलर्स टीव्ही वाहिनीवर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणारा ‘मानाचा मुजरा’ या विशेष कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमाचे वेगवेगळे टीझर फेसबुकवर व्हायरल होताना दिसत आहेत. यापैकी एका टीझरमध्ये अभिनेता संजय दत्त याने बाळासाहेबांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. माझी आई बाळासाहेबांना भाऊ मानायची असंही संजूबाबाने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. तसेच मी तुरुंगामध्ये असताना बाळासाहेब रोज मला एक मेसेज पाठवायचे असंही संजय दत्तने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमध्ये १९९३ च्या साळखी बॉम्बस्फोटांनंतर अवैधरित्या शास्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली संजय दत्तला अटक करण्यात आली होती. त्यावेळी संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी बाळासाहेबांकडे मदत मागीतली होती. त्यानंतरच बाळासाहेबांनी मदत केल्यानेच संजय दत्त तुरुंगाबाहेर पडला होता. बाळासाहेबांचे संजय दत्तवरील प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र या मलुखातीमध्ये बाळासाहेबांबद्दल संजय भरभरून बोलला आहे. अवधुत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये संजयने दत्त कुटुबियांचे बाळासाहेबांबरोबर कशाप्रकारे कौंटुंबिक संबंध होते याबद्दल भाष्य केलं आहे. जाणून घेऊयात काय म्हणाला आहे संजय या मुलाखतीमध्ये…

बाळासाहेब ठाकरे हे नाव आयुष्यामध्ये पहिल्यांदा कधी ऐकले?

पहिल्यांदा मी बाळासाहेबांचे नाव माझ्या आईकडून ऐकले. आई नेहमी म्हणायची की बाळासाहेब मला भावासारखे आहेत आणि त्यांच्याविषयी मला खूप आदर आहे. अमेरिकेत कर्करोगावरील उपचारासाठी जाण्याआधी आईने आम्हा तिघांना बोलावून सांगितलं होतं, ‘आयुष्यात काहीही लागलं तरी माझा एक भाऊ आहे, बाळासाहेब ठाकरे. तुम्ही त्यांच्याकडे नक्की जा.’

जेव्हा तुम्ही बाळासाहेबांना पहिल्यांदा भेटलात तेव्हाच्या काही आठवणी सांगाल का?

मी तुरुंगातून सुटल्यानंतर सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेलो. त्यानंतर थेट साहेबांना भेटायला गेलो. साहेब वाघ आहेत वाघ. त्यांनी मला खूप प्रेम दिलं. जेवढा वेळ मी आर्थर रोड कारागृहात होतो तेव्हा रोज त्यांचा मला मेसेज यायचा. ‘संज्या को बोल फिकर नही करने का मैं हूँ इधर,’ अशा शब्दांत ते मला आधार द्यायचे. ते राजकारणी होते पण त्याहून अधिक ते देशभक्त होते. एखाद्यावर प्रेम असल्यास ते मुक्तपणे व्यक्त करायचे, मग तो व्यक्ती चांगला असो किंवा वाईट. पण त्याच वेळी त्यांना राग आला तर तुम्ही संपलातच.

‘मानाचा मुजरा’ हा संपूर्ण कार्यक्रम रविवार दिनांक २० जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt talks about balasaheb thackeray in manacha mujara of colors marathi
First published on: 18-01-2019 at 16:34 IST