07 March 2021

News Flash

“मी त्याचा पराभव करेन”; कॅन्सरविषयी बोलतानाचा संजय दत्तचा व्हिडीओ व्हायरल

ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला फुफ्फुसाच्या चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं.

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कॅन्सरचं निदान झालं. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून “कॅन्सरचा मी पराभव करेन” असं तो यात म्हणताना दिसतोय. हेअरस्टायलिस्ट अलिम हकिमने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

“मी सलूनमध्ये आलोय आणि नवीन हेअरकटसुद्धा करून घेतला आहे. जर तुम्हाला हे दिसत असेल तर, हा माझ्या आयुष्यातला नवीन डाग आहे, पण मी कॅन्सरचा लवकरच पराभव करेन”, असं तो या व्हिडीओत म्हणताना दिसतोय. हेअरस्टायलिस्टबद्दल तो पुढे म्हणाला, “अलिम आणि माझी खूप जुनी ओळख आहे. त्याचे वडील माझ्या वडिलांचे केस कापायचे. रॉकी या चित्रपटासाठी हकिम साहब माझे स्टायलिस्ट होते आणि आता अलिम माझे केस कापू लागला आहे. कोणतीही नवीन हेअरस्टाइल करायची असेल तर तो मला बोलावतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Aalim Hakim (@aalimhakim) on

संजय दत्त ‘केजीएफ: चाप्टर २’मध्ये अधीराची भूमिका साकारताना दिसणार आहे. लवकरच शूटिंगला सुरुवात करणार असल्याचंही त्याने या व्हिडीओत सांगितलं. ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला फुफ्फुसाच्या चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं.

८ ऑगस्ट रोजी संजयला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची करोना चाचणी देखील करण्यात आली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे कळाले. संजय दत्तला कर्करोग झाल्याचे कळताच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने त्याची भेट घेतली. तसेच अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे संजय दत्त लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 9:02 am

Web Title: sanjay dutt talks about cancer diagnosis in new video ssv 92
Next Stories
1 सई ताम्हणकरच्या ‘त्या’ घोषणेने चाहत्यांमध्ये चर्चा
2 ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ने गाठला ३०० भागांचा टप्पा
3 ‘जस्टिस फॉर सुशांत’ म्हणणाऱ्या श्वेताने उचललं हे पाऊल; चाहते देखील झाले हैराण
Just Now!
X