News Flash

संजय दत्तला मिळाली ३०९ वी गर्लफ्रेंड, तिचे नाव आहे…

एका शोमध्ये संजय दत्तने हा खुलासा केला आहे

१७६१ साली अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात झालेल्या ‘पानिपत’च्या ऐतिहासिक लढाईवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले असून अभिनेता संजय दत्त, क्रिती सनॉन आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या हे त्रिकूट चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. त्यासाठी ते छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा’मध्ये पोहोचले आहेत.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार शोमध्ये संजय दत्तने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाचा खुलासा केला आहे. दरम्यान शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माने संजय दत्तला ‘संजू’ चित्रपटात दाखवल्या प्रमाणे ३०८ गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारला आहे. त्यावर संजय दत्तने मजेशीर उत्तर दिले आहे. मी माझ्या गर्लफ्रेंड किती झाल्या हे मोजत असतो आणि ते कायम मोजत राहणार. कारण माझा जीवन प्रवास अजून संपलेला नाही. पानिपत चित्रपटातील क्रितीच्या भूमिकेने मी प्रभावीत झालो आहे आणि ती सहजपणे माझी ३०९वी गर्लफ्रेंड होऊ शकते असे संजय म्हणाला आहे.

पाहा फोटो : हे कलाकार उलगडणार ‘पानिपत’चा इतिहास

‘पानिपत’ चित्रपट येत्या ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अर्जुन कपूर सदाशिव राव भाऊ यांची भूमिका साकारणार आहे तर क्रिती सनॉन पार्वती बाईंची भूमिका वठवणार आहे. तसेच संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 6:23 pm

Web Title: sanjay dutt talks about his 309 girlfriend avb 95
Next Stories
1 आमिर म्हणाला घवघवीत यश मिळो, ‘पानिपत’मधील कलाकार म्हणाले…
2 हिंमत असेल तर ये.. कपिल शर्माचे अक्षयला चॅलेंज
3 कंडोम बाळगा आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करा, निर्मात्याचे वादग्रस्त विधान