23 February 2019

News Flash

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर संजुबाबाच्या पदरात पडला आणखी एक चित्रपट!

या चित्रपटाच्या माध्यमातून संजयच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

संजय दत्त

बॉलिवूडच्या झगमगाटापासून बराच काळ दूर राहिलेला संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संजयच्या चर्चेत येण्याचं कारणंही तसंच आहे. त्याच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून संजयच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटामध्ये संजूची भूमिका अभिनेता रणबीर कपूर वठविणार आहे. एकीकडे संजयच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच संजयने बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी आणखी एक चित्रपट साईन केल्याचं सांगण्यात येत आहे.

संजय दत्तने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत त्यापैकी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘वास्तव’ हे चित्रपट त्याचे तुफान गाजले होते. त्यानंतर काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर संजयने चित्रपटसृष्टीतून काही काळ विसावा घेतला होता. मात्र संजूच्या निमित्ताने तो बॉलिवूडबरोबर पुन्हा जोडला गेला आहे. संजयच्या या कमबॅकमुळे तो आता ख-या अर्थाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला असून त्याने आताच ७ चित्रपट साईन केले आहेत. त्यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.  संजयने चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांचा एक चित्रपट साईन केल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रकाश झा यांच्या आगामी चित्रपटामध्ये संजयबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा हादेखील महत्वाची भूमिका पार पाडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश झा यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी संजय आणि सिद्धार्थबरोबर चर्चा केली असून या चित्रपटाचे चित्रीकरण यावर्षाच्या अखेरीपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. चित्रपटातील मुख्य नायकांची निवड झाली असली तरी नायिकेची निवड अद्याप झालेली नाही.
दरम्यान, संजयने आतापर्यंत ‘साहेब बीबी और गॅगस्टर ३’, ‘कलंक’,’शमशेरा’,’हाऊसफुल ४’, ‘तोरबाज’,  ‘प्रस्थानम’ आणि ‘पानिपत’ हे चित्रपट साईन केले आहेत. तसेच संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू हा चित्रपट येत्या २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on June 13, 2018 7:24 pm

Web Title: sanjay dutt to be a part of prakash jha next film