News Flash

प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांवर संजूबाबाच्या मुलीने साधला निशाणा

त्रिशालाने अनेकांचेच लक्ष वेधले आहे.

संजूबाबाची मुलगीही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या कलाकार आणि त्यांची मुलं चांगलीच चर्चेत आली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणाऱ्या कलाकारांपैकी अभिनेता शाहरुख खान, सैफ अली खान यांसारख्या कलाकारांच्या मुलांवर सध्या प्रसारमाध्यमांच्या नजरा खिळल्या आहेत. सोशल मीडियावरही या सेलिब्रिटी मुलांची छायाचित्रे चांगलीच गाजत आहेत. त्यातच आता भर पडली आहे ती म्हणजे संजय दत्तच्या मुलीची. संजूबाबाची मुलगीही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. तिने पोस्ट केलेला एक फोटो सध्या चर्चेत आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये त्रिशालाने अनेकांचेच लक्ष वेधले आहे. प्रथमदर्शनी हे छायाचित्र हॅलोविनच्या निमित्ताने पोस्ट केल्याचे कळते. पण, त्यानंतर त्यासोबत लिहिलेले कॅप्शन मात्र काही वेगळेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सौंदर्य खुलविण्याच्या नावाखाली प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या अभिनेत्रींसाठी हे कॅप्शन लिहिल्याचे लक्षात येत आहे. प्लास्टिक सर्जरीच्या नादात बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या चेहऱ्यामध्ये बदल केल्याचे आपण जाणतो. पण, खूप कमी कलाकार त्यांच्या सर्जरीबद्दल उघडपणे बोलतात. कोणत्याही चित्रपटसृष्टीमध्ये कलाकारांच्या गुपितांपैकी प्लास्टिक सर्जरी हे एक महत्त्वाचे गुपित असते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मायकल जॅक्सन यांनीही प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच बॉलिवूडमध्येही अभिनेत्री अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, श्रीदेवी, वाणी कपूर अशा विविध अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरीच्या मार्गाचा वापर केला आहे. प्लास्टिक सर्जरी हा काही अभिनेत्रींच्या जिव्हाळ्याचा विषय असला तरीही अनेकदा त्याचे चुकिचे परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्लास्टिक सर्जरी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार यांच्यावर बोलावं तितकं कमीच आहे. तुर्तास ज्या फोटोमुळे संजूबाबाची त्रिशाला चर्चेत आहे, तोच हा फोटो…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 1:16 am

Web Title: sanjay dutts daughter trishala takes a swipe at bollywoods love for plastic surgery with this horrific pic
Next Stories
1 भारतात आल्यावर सलमानसाठी लूलियाने केली होती ही तडजोड?
2 रजनीकांतच्या चाहत्यांसाठी ‘कबाली’चा स्टार गोल्डवर प्रिमियर
3 VIDEO: अशा रितीने आमिर खान बनला ‘हानिकारक बापू’
Just Now!
X