08 December 2019

News Flash

‘सूर सपाटा’मध्ये संजय जाधवचा खलनायकी अंदाज

'दुनियादारी' चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव यामध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.

संजय जाधव

आतापर्यंत विविध खेळांवर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिलेत पण अस्सल मातीतला खेळ ‘कबड्डी’ तसा दुर्लक्षितच राहिला म्हणायचा. नेमकी हीच बाब हेरत जयंत लाडे यांनी ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे. ‘दुनियादारी’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव यामध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.

सिनेमॅटोग्राफी, लेखन, दिग्दर्शननंतर आता अभिनय क्षेत्रात संजय जाधव आपलं नशीब आजमावत आहेत. कबड्डीला आज अनन्यसाधारण महत्त्व आलं असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कबड्डीची दखल घेतली गेलेली आहे. याला अनुसरूनच ‘सूर सपाटा’ची कथा मंगेश कंठाळे यांनी बांधली आहे. गावखेड्यातील उनाडटप्पू विद्यार्थी ते साहसी कबड्डीपटू असा रोमांचकारी प्रवास यामध्ये रेखाटण्यात आला आहे.

किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित ‘सूर सपाटा’च्या निमित्ताने तब्ब्ल २५ दिग्गज कलावंतांचा ताफा आमने-सामने येणार आहे. तर उपेंद्र लिमये आणि संजय जाधव यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी खास असतील. अनेक दर्जेदार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीय पुरस्कारविजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका ‘सूर सपाटा’मध्ये आपल्याला पहायला मिळतील.

अनेक चित्रपट आणि मालिकांना मार्गदर्शन करणाऱ्या संजय जाधवांचं नेतृत्त्व ‘सूर सपाटा’तील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करतं हे पाहणं रंजक ठरणार आहे. २२ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

First Published on February 11, 2019 2:00 pm

Web Title: sanjay jadhav in negative role upcoming marathi movie sur sapata film based on kabaddi
Just Now!
X