News Flash

अमेय खोपकरमुळे संजय जाधवच्या चित्रपटाचे शीर्षक मराठीत?

संजय जाधवच्या आजवरच्या चित्रपटांची शीर्षकं हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पाहायला मिळाली आहेत.

अमेय खोपकर

चित्रपट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमुळे ‘ये रे ये रे पैसा’च्या कलाकारांबद्दल अजूनच उत्सुकता वाढताना दिसत आहे. ट्विटमध्ये त्यांनी आपण लवकरच कलाकारांची नावं सगळयांसोमर आणणार आहोत असं लिहिलं आहे.

‘ये रे ये रे पैसा’ हा चित्रपट ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होणार असला तरी त्याची उत्सुकता सगळीकडे दिसून येत आहे आणि त्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. उत्सुकतेची अनेक कारणं आहेत म्हणजेच संजय जाधव याच्या चित्रपटात नेहमी पाहिलेले चेहरे यावेळीसुद्धा ‘ये रे ये रे पैसा’मधून प्रेक्षकांना दिसतील की काही नवीन चेहरे घेऊन संजय जाधव सर्वांना सरप्राईज देणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याचसोबत संजय याच्या चित्रपटांची अजून एक अनोखी स्टाईल म्हणजे त्याच्या चित्रपटातील हिंदी गाणी आणि चित्रपटाचं हिंदी भाषिक नावं.

वाचा : ‘या घाणीत आम्हाला प्रयोग करायचाय’, सुमित राघवनने काढले औरंगाबादमधील नाट्यगृहाचे वाभाडे

‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘तू हि रे’, ‘चेकमेट’, ‘गुरु’ ही सर्वच नावं हिंदी किंवा इंग्लिश भाषिक आहेत पण यावेळी चक्क संजय जाधवने मराठी भाषिक नाव चित्रपटाला दिलं आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर त्यांच्या AVK फिल्म्स या कंपनी अंतर्गत ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ते याआधी ‘लई भारी’ या मराठी चित्रपटाचे सहनिर्माते होते. मराठी भाषेकडे त्यांचा नेहमीच कल असतो आणि त्यावर ते वारंवार भाष्य सुद्धा करतात. संजय जाधव याच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक हे मराठीत आहे हेच तर त्यामागचं कारण नाही ना??? असा सवाल आता अनेकांना पडला आहे.

वाचा : कधी विमानतळावर तर कधी कारमध्ये.. सोनालीने असं साजरं केलं रक्षाबंधन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 10:18 am

Web Title: sanjay jadhavs film has marathi title is ameya khopkar a reason behind it
Next Stories
1 Raksha Bandhan 2017: ही आहेत बॉलिवूडमधील रक्षाबंधनची सदाबहार गाणी
2 कधी विमानतळावर तर कधी कारमध्ये.. सोनालीने असं साजरं केलं रक्षाबंधन
3 Raksha Bandhan 2017: निर्मिती – कमलेशचे हे रेशमी बंध
Just Now!
X