20 January 2020

News Flash

अनन्या पांडेच्या ड्रेसवर संजय कपूरची आक्षेपार्ह कमेंट; म्हणाला…

या कमेंटवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत

अनन्या पांडे संजय कपूर

अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आणि नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे ही नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिली होती. यावेळी रेड कार्पेटवर तिने घातलेल्या काळ्या रंगाच्या आगळ्यावेगळ्या ड्रेसची नेटवर चांगलीच चर्चा आहे. मात्र त्याचप्रमाणे तिच्या या ड्रेसवर अभिनेता संजय कपूर याने केलेली कमेंटही तितकीच चर्चेत असून या कमेंटवरुन अनेकांनी संजय यांना ट्रोलही केले आहे.

अनन्याने रेडकार्पेटवर याच ड्रेसमध्ये शूट केलेला एक बुमरँग व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. अनन्याच्या या पोस्टवर तिची खास मैत्रिण असणाऱ्या शनया कपूर हिचे वडील आणि अभिनेता संजय कपूर यांनाही एक कमेंट केली आहे. मात्र या कमेंटवर नेटकऱ्यांनी आक्षेप नोंदवत संजय यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

अनन्याने पोस्ट केलेल्या रेड कार्पेटवरील व्हिडिओमध्ये ती काळ्या रंगाच्या ट्यूब ड्रेसमध्ये दिसत आहे. हा ड्रेस प्रबळ गुरुंग यांनी डिझाइन केला आहे. ईल ब्युटी अवॉर्ड्स २०१९ सोहळ्यात सहभागी होण्याआधी अनन्याने रेडकार्पेटवर डान्स करतानाच बुमरँग शूट केला आहे. यामध्ये ती जागेवर उभी राहून एक स्टेप करताना दिसत आहे. ‘हा ड्रेस खूपच भारी असून यामध्ये केवळ एकच बुमरँग काढणे शक्य नाही,’ असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

काळ्या रंगाचा ड्रेस घालून नाचतानाचे तीन बुमरँग व्हिडिओ अनन्याने पोस्ट केल्यानंतर या फोटोवर संजय कपूर यांनी, ‘हा ड्रेस पडणार आहे जरा काळजी घे,’ अशी कमेंट केली आहे.


संजय यांच्या या कमेंटवर त्यांना अनेकांनी सुनावले आहे. ‘खरोखर ही कमेंट तुम्ही केली आहे का?’ इथपासून ते ‘तुम्ही तुमची मर्यादा ओलांडत आहात’ अशापर्यंतच्या अनेक रिप्लाय संजय यांच्या कमेंटवर नेटकऱ्यांनी केले आहेत. तर दुसरीकडे संजय यांच्या चाहत्यांनी पांडे आणि कपूर कुटंबामध्ये घरोब्याचे संबंध असून संजय आणि अनन्यामध्ये बाप-लेकीसारखे नाते आहे. त्यामुळे संजय यांनी विनोदबुद्धीने ही कमेंट केल्याचे म्हटले आहे. संजय यांच्यावर टीका करणारे आणि समर्थन करणारे या पोस्टवर वाद घालत असले तरी अनन्याने यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

अनन्या लवकरच ‘मीया बिवी और वो’ या सिनेमामध्ये कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरसोबत दिसणार आहे.

First Published on October 12, 2019 12:46 pm

Web Title: sanjay kapoor comments on ananya panday post the dress is going to fall gets brutally trolled scsg 91
Next Stories
1 प्रेक्षकांच्या लाडक्या आक्कासाहेब लवकरच नव्या मालिकेत
2 रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार
3 …म्हणून ’83’च्या चित्रीकरणानंतर रणवीरला कोसळलं रडू
Just Now!
X