14 December 2017

News Flash

१३ वर्षांनंतर ‘हा’ अभिनेता करतोय कमबॅक

२३ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 5:54 PM

'स्टार प्लस'वरील मालिकेतून करणार कमबॅक

अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार यांसारखे कलाकार सध्या छोट्या पडद्यावरील विविध शोजमधून झळकत आहेत. रिअॅलिटी शो, अनोख्या संकल्पनांचे कार्यक्रम, मोठ्या बजेटच्या मालिका यांमुळे बॉलिवूड कलाकारांमध्ये छोट्या पडद्याचे आकर्षण असल्याचे पाहायला मिळते. १३ वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर राहिलेला एक अभिनेता आता कमबॅक करत आहे. तो अभिनेता म्हणजे संजय कपूर. ‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटच्या माहितीनुसार ‘स्टार प्लस’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘दिल संभल जा जरा’ या मालिकेत संजय कपूर भूमिका साकारणार आहे. २३ ऑक्टोबरपासून ही मालिका प्रसारित होणार आहे.

२००३-०४ मध्ये संजय कपूर ‘करिश्मा’ या शोमध्ये करिश्मा कपूर, अरबाज खान, जुगल हंसराज आणि अर्षद वारसी यांच्यासोबत झळकला होता. ‘दिल संभल जा जरा’ या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर १३ वर्षांनंतर कमबॅक करत आहेत.

वाचा : सुशांत सिंग राजपूतला कोणी फसवलं?

विक्रम भट्ट निर्मित या मालिकेचा फर्स्ट लूक आणि प्रोमो ‘स्टार प्लस’च्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. संजय कपूरची पत्नी महीपनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रोमो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. मालिकेत अभिनेत्री स्मृती कालरा संजय कपूरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या दोघांसोबत निकी अनेजा वालियासुद्धा या मालिकेत झळकणार आहे.

First Published on October 12, 2017 5:54 pm

Web Title: sanjay kapoor will do comeback on screen after 13 long years