24 February 2021

News Flash

शिवणकाम करून आई चालवायची घर; संजय लीला भन्साळींची संघर्षमय प्रवास

जाणून घ्या, भन्साळींविषयी काही खास गोष्टी

बॉलिवूडमध्ये संजय लीला भन्साळी या नावाचं मोठं प्रस्थ आहे. ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यात त्यांचं नाव कायमच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या ऐतिहासिक चित्रपटांमधून जणू ते संपूर्ण इतिहासा पुन्हा जिवंत करत असतात. त्यामुळे संजय लीला भन्साळी हे नाव कलाविश्वाप्रमाणेच चाहत्यांमध्येही तितकचं लोकप्रिय आहे. आज यशाच्या शिखरावर असलेल्या या दिग्दर्शकाचा एकंदरीत प्रवास पाहिला तर अनेक जण अवाक् होतील. कारण, सध्या अमाप संपत्ती मिळवणाऱ्या भन्साळी यांनी एकेकाळी प्रचंड हालाखीचे जीवन जगलं आहे.

‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ यासारखे असंख्य सुपरहिट चित्रपट देणारे संजय लीला भन्साळी यांचा कलाविश्वापर्यंतचा प्रवास फार काही सोप्पा नव्हता. एकेकाळी त्यांच्या आईने शिवणकाम करुन कुटुंबाचा सांभाळ करत होती. विशेष म्हणजे भन्साळी यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. मात्र, कधीही ते याविषयी खुलेपणाने व्यक्त झालेले नाहीत.

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे भन्साळी यांना लहानपणी बराच संघर्ष करावा लागला. तसंच घरखर्चासाठी त्यांची आई शिवणकाम करायची. म्हणूनच भन्साळी यांना त्यांच्या आईने केलेल्या कष्टाची जाणीव असून ते त्यांच्या नावापुढे कायम आईचं नाव जोडतात.

संजय लीला भन्साळी यांनी १९९६ मध्ये ‘खामोशी द म्युझिकल’च्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही.मात्र चित्रपट समीक्षकांकडून त्यांना चांगली दाद मिळाली. त्यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या करिअरचा आलेख उंचावत गेला.

भन्साळी यांचे गाजलेले चित्रपट
‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘ब्लॅक’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’, ‘पद्मावत’, ‘सावरियाँ’.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 8:49 am

Web Title: sanjay leela bhansali birthday hit movies successfull director personal life ssj 93
Next Stories
1 उर्वशी रौतेलाच्या जॅकेटची किंमत माहिती आहे का? तेवढ्या पैश्यात होईल युरोप ट्रिप
2 सारा अली खान करते या दक्षिणात्य सुपरस्टारला डेट?
3 ‘सूर्यपुत्रा’ची कथा आता मोठ्या पडद्यावर; महावीर कर्णाच्या आयुष्यावरचा चित्रपट
Just Now!
X