रणवीर सिंग हा चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लिला भन्साळींचा सर्वात आवडता अभिनेता. आतापर्यंत भन्साळी यांनी रणवीर सोबत तीन चित्रपट केले. हे तिन्ही चित्रपट तुफान चालले. ‘राम-लीला’, ‘बाजीराव- मस्तानी’ आणि त्यानंतर ‘पद्मावत’ या तिन्ही चित्रपटात भन्साळी यांनी रणवीरला संधी दिली. रणवीरनं या संधीचं सोनं केलं. तिन्ही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला कमावला. भन्साळींची दीपिका- रणवीर ही जोडी हिट ठरली पण, भन्साळींच्या आगामी चित्रपटात मात्र ही जोडी दिसणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : कास्टिंग काऊचच्या मुद्द्याचं तुला गांभीर्य आहे की नाही; नेटकऱ्यांनी रणबीरला धरलं धारेवर

‘पद्मावत’च्या दमदार यशानंतर भन्साळी लवकरच आणखी एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटात भन्साळी यांनी रणवीरच्या नावाऐवजी हृतिकतच्या नावाचा विचार केला  असल्याचं समजत आहे. या सिनेमासाठी रणवीरऐवजी हृतिक सर्वोत्तम ठरू शकतो अशी आशा भन्साळींना आहे म्हणूनच या चित्रपटासाठी हृतिकला त्यांनी गळ घातली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या सिनेमासाठी हृतिकनंही लागलीच होकार भरला असल्याचंही बोललं जात आहे.  हृतिकनं भन्साळींच्या ‘गुजारिश’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.

Arijit Singh Birthday Special : रिअॅलिटी शोमधील पराभवानंतरही ‘तो’ ठरला नंबर वन गायक!

तुर्तास या चित्रपटाचं नाव ‘प्रिन्स’ असं निश्चित करण्यात आल्याचं समजत आहे. अर्थात नावावरून या चित्रपटात हृतिक एखादी ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘जोधा अकबर’ नंतर बऱ्याच वर्षांनी हृतिकला राजाच्या भूमिकेत पाहता येणार आहे. दरम्यान भन्साळींची आवडती जोडी दीपिका- रणवीर ही यशराज फिल्मचा सिनेमा करणार आहे. रणवीरऐवजी नव्या चित्रपटात हृतिकला भूमिका देऊ केल्यानं सिनेसृष्टीत थोडं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण हृतिकच्या नावाऐवजी भन्साळींनी शाहीदच्या नावाचा विचार का केला नाही असाही प्रश्न अनेकांना पडला  आहे. ‘पद्मावत’ सिनेमात शाहिदनं केलेल्या अभिनयाचं भन्साळींनी भरभरून कौतुक केलं होतं. त्यामुळे नवीन चित्रपटासाठी त्याच्या नावाचा विचार का झाला नाही याचं कुतूहल अनेकांना आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay leela bhansali chooses hrithik roshan over ranveer singh
First published on: 25-04-2018 at 13:36 IST