News Flash

जेव्हा भन्साळींसोबत काम करण्यासाठी सोनमला बोलावं लागलं होतं खोटं

सोनम कपूरनं बॉलीवूडमध्ये पूर्ण केली १३ वर्ष

अभिनेत्री सोनम कपूरनं बॉलिवूडमध्ये आपली तेरा वर्ष पूर्ण केली आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सावरिया या चित्रपटातून अभिनेता रणबीर कपूरसह तिनं आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. अभिनयाव्यतिरिक्त सोनम कपूरनं संजय लीला भन्साळी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं. या चित्रपटातून रणबीर कपूरनही पदार्पण केलं होतं. संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्यासाठी सोनम कपूरला खोटंही बोलावं लागलं होतं. याचा खुलासा खुद्द सोनम कपूरनं एका मुलाखतीदरम्यान केला होता.

जेव्हा आपण पहिल्यांदा संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली होती तेव्हा त्यांना आपण अनिल कपूर यांची मुलगी असल्याची कल्पनाच नव्हती, असं सोनमनं यापूर्वी सांगितलं होतं. ईटीसीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिनं याबाबत माहिती दिली होती. पहिल्याच भेटीमध्ये संजय लीला भन्साळी यांनी आपल्याला सहाय्यक दिग्दर्शकाऐवजी अभिनय करण्याचा सल्ला दिल्याचंही तिनं सांगितलं होतं.

दरम्यान, संजय लीला भन्साळी यांना सोनम कपूरची ओळख समजल्यानंतर ते थोडे अपसेटही झाली होती. तसंत तिला चित्रपटात अभिनय करण्याची परवानगी आहे का असा प्रश्नही केला होता. “मी त्यावेळी १७ वर्षांची होते आणि खुप खोटं वगैरे सांगून मी त्या ठिकाणी गेले होते. परंतु माझ्या स्वत:च्या हिंमतीवर मला ते मिळालं,” असंही तिनं मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. सोनम कपूरनं शेवटचं दलकीर सलमानसोबत ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात अभिनय साकारला होता. तिनं आपल्या पुढील कोणत्याही प्रोजेक्टबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. सध्या सोनम कपूर आपला पती आनंद अहुजा याच्यासोबत लंडनमध्ये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 12:36 pm

Web Title: sanjay leela bhansali didnt know sonam kapoor was anil kapoors daughter at first got very upset when he found out jud 87
Next Stories
1 ‘EVM मध्ये घोळ आहे?’ लेखकाच्या ट्विटवर दिग्दर्शक संतापला, म्हणाला…
2 ‘…आणि तिने होकार दिला’; नेहा-रोहनप्रीतची प्यारवाली लव्हस्टोरी
3 Photo : ‘रश्मी रॉकेट’मधील तापसीचा फर्स्ट लूक; साकारतेय अ‍ॅथलिटची भूमिका
Just Now!
X