News Flash

संजय लीला भन्साली यांनी सुशांतला ऑफर केले होते ४ चित्रपट?

सध्या सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरु आहे

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यानंतर बिहारमध्ये पेशानं वकील असलेल्या सुधीर कुमार ओझा यांनी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये त्यांनी सुशांत सिंह राजपूतला सात चित्रपटातून काढण्यात आले आणि काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. या ओढावलेल्या परिस्थितीमुळे त्याला इतके टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडले असा आरोप करण्यात आला आहे. पण आता संजय लीला भन्साली यांनी सुशांतला चार चित्रपटांची ऑफर दिल्या होत्या अशा चर्चा सुरु आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बॉलिवूडमधील अनेकजण सुशांतच्या जाण्यावर शोक व्यक्त करत आहेत. पण खूप कमी लोकांना माहित आहे की संजय आणि सुशांत यांच्यामध्ये खूप चांगले नाते होते. दोघांनाही एकमेकांचे काम आवडत होते. खरतर ते दोघे एकदा नाहीतर चार वेळा चित्रपटात एकत्र काम करणार होते. पण त्यांच्या तारखा जुळत नसल्यामुळे ते शक्य झाले नाही’ असे म्हटले आहे.

संजयच नाही तर एकता आणि सुशांत यांच्यामध्येही चांगले बॉन्डिंग होते. तिने अनेकदा सोशल मीडियाद्वारे सुशांतला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. तसेच एकताने त्याला प्रोजेक्ट्ससुद्धा ऑफर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

View this post on Instagram

 

We are at a loss of words. Sushant will be deeply missed. Strength to his family and friends. #SushantSinghRajput

A post shared by Bhansali Productions (@bhansaliproductions) on

सुशांतच्या निधनानंतर संजय लीला भन्साली यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली होती.

सलमान खान, करण जोहर, संजय लीला भंसाली, एकता कपूर आणि बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींविरोधात तक्रार दाखल करताना तक्रारीमध्ये सुशांत सिंह राजपूतला सात चित्रपटातून काढण्यात आले आणि त्याचे काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. या ओढावलेल्या परिस्थितीमुळे त्याला इतके टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडले असा आरोप करण्यात आला आहे.

रविवारी, १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. सुशांतच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 5:25 pm

Web Title: sanjay leela bhansali offered sushant singh rajput 4 films
Next Stories
1 करण जौहर वैतागला; टीकाकारांना टाळण्यासाठी शोधला ‘हा’ मार्ग
2 सुशांतला न्याय द्या; सलमान खान विरोधात २९ लाख लोकांनी केल्या सह्या
3 Video : गर्लफ्रेंडच्या नावाऐवजी आता बिग बॉसचा डोळा; ब्रेकअपनंतर पारस छाब्राने मिटवला टॅटू
Just Now!
X