News Flash

“मै गंगूबाई”…आलियाच्या दमदार अभिनयाची झलक, पाहा टीझर

संजय लीला भन्साळींच बर्थडे सरप्राइज

अभिनेत्री आलिया भट्टने ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचं पोस्टर शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा केलीय. पोस्टर रिलीज केल्यानंतर अवघ्या काही तासातचं या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. येत्या 30 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमाच्या टीझरमध्ये आलियाचा कधीही न पाहिलेला अंदाज समोर आलाय. आलियाची दमदार चाल, तिचा भारदस्त आवाज आणि करडी नजर यावरुन तिने भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतल्याचं दिसून येतंय. कामाठिपुरा इथल्या वैश्या व्यवसायात दबदबा असलेल्या गंगूबाईचा संघर्षमय प्रवास या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.

मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील टप्पे सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केलाय. संयज लीला भन्साळी यांच्या वाढदिवसानिमित्तानं टीझर रिलीज करण्यात आला आहे.

आलिया भट्टने सोशल मीडियावर टीझर शेअर करत दिग्दर्शक संजय लीली भन्साळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “मला वाटतं तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा याहून वेगळा मार्ग असूच शकतं नाही. मी माझ्या हृदयाचा आणि आत्म्याचा एक भाग तुमच्या समोर सादर करतेय..भेटा गंगूला!” असं कॅप्शन देत आलियाने संजय लीला भन्साळी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अवघ्या काही तासातच आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओला दोन लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत. तर अनेकांनी आलियाचं कौतुक केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 5:53 pm

Web Title: sanjay leela bhansali release teaser of gangubai kathiyawadi starting with aliaa bhat kpw 89
Next Stories
1 ……म्हणून संजय लीला भन्साळीला वाटायचं की आलिया रणबीरसोबत फ्लर्ट करतेय!
2 Video : देवदत्त बाजीचे ‘मोरे पिया’ रसिकांच्या भेटीला
3 …म्हणून शिवा- सिद्धीने केलं सेटवरच जंगी सेलिब्रेशन
Just Now!
X