मुंबईमध्ये करोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अद्याप करोनाचं संकट टळलेलं नाही. यातच आता चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या संजय लीला भन्साळी हे गंगूबाई काठियावाडीचे चित्रीकरण करत होते.
इंडिय एक्सप्रेसला सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, “संजय लीला भन्साळी यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:ला कॉरन्टाईन केले आहे. संजय लीला भन्साळी आणि रणबीर दोघांनाही करोनाची लागन झाली आहे. आलिया आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने ही करोनाची चाचणी केली आहे.”
आणखी वाचा- कन्फर्म! रणबीर कपूरला करोनाची लागण
सुत्राने दिलेल्या माहिती नुसार भन्साळी यांच्या आई लीला भन्साळी सुखरूप आहेत. “संजय लीला भन्साळी यांना करोनाची लागन झाल्याचे समोर आल्या नंतर, त्यांनी लगेच त्यांच्या आईचीही चाचणी केली. मात्र त्या करोना निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तरी देखील त्यानी स्वत: ला कॉरन्टाईन केले आहे.
संजय लीला भन्साळी मुंबईत गंगूबाई काठियावाडीचे शूटिंग करत होते. तर अभिनेता अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी नुकताच सेटवर आला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 9, 2021 2:46 pm