संजय लीला भन्साळीने बॉलिवूडला अनेक नवीन चेहरे दिले आहेत. रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांनाही संजय यांनीच ब्रेक दिला. यानंचर संजय यांनी रणवीर सिंग यांनाही ‘गोलियों की रासलीला: राम-लीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातून एक वेगळी ओळख दिली.
आता संजय लीला भन्साळी त्यांच्या आगामी सिनेमातून आणखी एका नवीन चेहऱ्याला सिनेसृष्टीत आणत आहेत. तिच्या निवडीची खास गोष्ट म्हणजे यासाठी संजयला फारशी मेहनत घ्यावीच लागली नाही. हा नवीन चेहरा त्यांना त्यांच्याच घरी मिळाला.

तो चेहरा म्हणजे संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सेहगल. संजय लीला भन्साळी यांचा हा सिनेमा एक म्युझिकल सिनेमा असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मंगेश करणार आहे. याबद्दल एका मुलाखतीत मंगेश म्हणाला की, हा एक संगीतमय सिनेमा आहे. या सिनेमासाठी तरुण जोडप्याची गरज होती आणि शर्मिन या भूमिकेसाठी चपखल बसली. हा सिनेमा या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होईल. याशिवाय मी या सिनेमाबद्दल अजून काही सांगू शकत नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक बिग बजेट सिनेमा आहे आणि संजय यांनी शर्मिनच्या पदार्पणामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवायची नाही. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी की, शर्मिन ही संजय लीला भन्साळी यांची बहिण बेला सेहगल हिची मुलगी आहे. बेलाने संजयच्या अनेक सिनेमांचे संकलन केले आहे. बेलाचे पती आणि शर्मिन हिचे बाबा सुप्रसिद्ध दिग्दर्शक मोहन सेहगल यांचे पुत्र आहे. १९७० मध्ये त्यांनी सावन भादों या सिनेमातून अभिनेत्री रेखा यांना लॉन्च केले होते.

दरम्यान, संजल लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान काही दिवसांपूर्वी सेटवरील एका कामगाराचा मृत्यु झाला होता. या कामगाराच्या मृत्युनंतर ‘फिल्म स्टुडिओ सेटिंग अॅण्ड अॅलाइड मजदूर युनियन’ यांच्याकडून त्या अपघातात जीव गमावलेल्या कामगाराच्या कुटुंबासाठी भरपाईची मागणी केली आहे. युनियनचे महासचिव गंगेश्वरलाल श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार सदर घटनेसंदर्भात सिनेमाच्या दिग्दर्शकांना नोटीस पाठवून त्या कामगाराच्या कुटुंबास झालेल्या नुकसानाच्या भरपाईची मागणी करण्यात येणार आहे.