News Flash

..असा असेल ‘पद्मावती’चा क्लायमॅक्स?

या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

पद्मावती, दीपिका पदुकोण

संजय लीला भन्साली यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची स्क्रिप्ट लीक झाल्याच्या आणि या चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक लीक झाल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. आता सध्या हा चित्रपट पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे तो म्हणजे याच्या क्यायमॅक्समुळे.

या चित्रपटामध्ये एका ऐतिहासिक काळावर भाष्य करणारे कथानक साकारण्यात आले आहे. मेवाडची राणी पद्मावती, राजा रतन सिंग आणि अलाउद्दीन खिल्जी या एेतिहासिक पात्रांच्या भूमिका या चित्रपटातून साकारण्यात आल्या आहेत. एेतिहासिक कथेनुसार अलाउद्दीन खिल्जीची राणी पद्मावतीवर वाईट नजर होती आणि तिला मिळवण्यासाठी म्हणून त्याने चित्तोडवर हल्ला केला होता. खिल्जीच्या या हल्ल्यानंतर राणी पद्ममावतीने आगीत उडी मारुन स्वत:च्या प्राणांची अहूती दिली होती.

जर संजय लीला भन्साळी यांनी त्या कथानकामध्ये काहीही छेडछाड न करता तसेच चित्रण केले तर या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्येही दीपिका आगीत उडी मारण्याचे दृश्य दाखवण्यात येईल. त्यामुळे आता या चित्रपटातील क्लायमॅक्सबद्दल प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण झाले असून मोठ्या उत्साहात ‘पद्मावती’चे चित्रीकरण सुरु झाले आहे. ‘पद्मावती’च्या चित्रीकरणातील कोणतीही माहिती बाहेर लीक होऊ न देण्यासाठी भन्साळी जास्तच काळजी घेत आहेत. त्यासाठी त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर मोबाईल वापरण्यास सक्तीची बंदी घातली आहे. ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटामध्ये ज्या प्रकारची भव्यता पाहायला मिळाली होती त्याचप्रकारची भव्यता किंबहुना त्याहीपेक्षा जास्त भव्य आणि नेत्रदीपक देखावे ‘पद्मावती’ या चित्रपटामध्ये पाहता येणार आहेत. या चित्रपटामध्ये दीपिकासह अभिनेता रणवीर सिंग आणि शाहिद कपूरही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. रणवीर या चित्रपटातून अलाउद्दीन खिल्जीच्या रुपात झळकणार आहे. त्यामुळे भन्साळींच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाकडे अनेकांचेच लक्ष लागून राहिले आहे यात शंकाच नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 4:38 pm

Web Title: sanjay leela bhansalis film padmavati climax revealed
Next Stories
1 ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना जीवनगौरव पुरस्कार
2 ग्लोबल सिटीझन महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार भाषण
3 अनुष्काने अशा प्रकारे सांगितली तिच्या आगामी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख
Just Now!
X