09 July 2020

News Flash

हरहुन्नरी कलाकार संजय मोने येतायत लोकसत्ता डिजिटल अड्डावर

संजय मोने यांना लोकसत्ता फेसबुक पेजवरुन तुम्ही देखील विचारा प्रश्न

प्रसिद्ध अभिनेते, लेखक संजय मोने तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर येणार आहेत. ही मुलाखत वाचकांना लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे.

संजय मोने मराठीतील एक नामवंत अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर ‘टाइम बरा वाईट’, ‘पेइंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’ ‘क्लासमेट्स’, ‘अ रेनी डे’, ‘मातीच्या चुली’, ‘रिंगा रिंगा’ आणि ‘भो भो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह त्यांना एक उत्तम लेखक म्हणूनही ओळखले जाते. ‘सत्य सावित्री आणि सत्यवा, ‘संशय कल्लोळ’, ‘साडे माडे तीन’, ‘इट्स ब्रेकिंग न्युज’, ‘पक पक पकाक’ या चित्रपटांतील संवाद लिहिले आहेत. याशिवाय रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘इन्वेस्टमेंट’ या पुरस्कार विजेत्या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

या हरहुन्नरी कलावंताला थेट प्रश्न विचारण्याची संधी प्रेक्षकांनाही मिळणार आहे. मंगळवार ३० जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून संजय मोने ‘LoksattaLive’ या फेसबुक पेजवर लाइव्ह असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 1:23 pm

Web Title: sanjay mone on loksatta digital adda mppg 94
Next Stories
1 “चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाका”; चीनला धडा शिकवण्यासाठी कंगनाचे आवाहन
2 आलिया भट्टचा ‘सडक २’ होणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित
3 सलमानच्या गाण्यावर कोरियन डान्स; अनुराग कश्यपने शेअर केला अनोखा व्हिडीओ
Just Now!
X