News Flash

संजय नार्वेकरचे ‘नसते उद्योग’

‘चला हवा येऊ द्या’ची लंडनवारी

धावपळीच्या आयुष्यात दोन घटका करमणूक होईल व थोडे खळाळून हसता येईल अशा प्रकारच्या मनोरंजनाची गरज सर्वानाच असते. याच उद्देशाने झी टॉकीज वाहिनी ‘न.स.ते. उद्योग’ हा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २९ ऑक्टोबरपासून दर रविवारी रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.‘न.स.ते. उद्योग’ कार्यक्रमात अभिनेते संजय नार्वेकर, नीलेश दिवेकर, शेखर फडके, नम्रता आवटे, पंकज पंचारिया, जनार्दन लवंगारे हे कलाकार आहेत. ‘नसते’ हे एका माणसाच्या नावाचे लघुरूप असून ‘नरसिंगराव सर्जेराव तेलेपाटील’ असे त्यांचे नाव आहे. ही भूमिका  संजय नार्वेकर साकारत आहेत. नरसिंग हा एका खेडेगावातील शेतकरी पाटलाचा गडगंज श्रीमंत मुलगा आहे. या माणसाला स्वत:चा उद्योग करायचा आहे. त्यासाठी तो नानखटपटी करतो. पण यश काही येत नाही. पण हताश न होता तो पुन्हा जोमाने उभा राहून नवीन उद्योग करायला सज्ज होतो, असे संजय नार्वेकर यांनी सांगितले. झी मराठी वाहिनीवरील ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेतील ‘शिऱ्या’च्या भूमिकेतील कलाकार व सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेले विकास कदम यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे.

‘चला हवा येऊ द्या’ची लंडनवारी

‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम आता लवकरच लंडनची वारी करणार आहे . येत्या १२ नोव्हेंबर रोजी ‘चला हवा येऊ द्या’चा चमू लंडनच्या ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये खास कार्यक्रम करणार आहे. डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे हे कलावंत लंडनमधील शोमध्ये सहभागी होतील.  ‘ट्रॉक्सी’ हे प्रख्यात थिएटर असून, तेथे यापूर्वी डॅनी बॉयल (स्लम डॉग मिलेनियर), रिचर्ड ब्रॅनसन (व्हर्जनि ग्रुप) अशा दिग्गजांनी शो केले आहेत.

‘आम्ही दोघी’

चित्रपट, रंगभूमीवरील आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून कसदार अभिनयाने अभिनेत्री प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या दोन्ही अभिनेत्रींचा चाहता वर्गही मोठा आहे. मराठीतील या दोघी अभिनेत्री आता ‘आम्ही दोघी’ या आगामी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. अभिनेत्री, वेशभूषाकार आणि सहदिग्दर्शिका म्हणून ओळख असलेल्या प्रतिमा जोशी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘आम्ही दोघी’ ही आजच्या तरुणींच्या नातेसंबंधांची गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतच्या दृष्टिकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टिकोनही विचारात घेतला पाहिजे, हे यात सांगण्यात आले आहे. प्रतिमा जोशी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या तब्बल १० चित्रपटांमध्ये सहदिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. यात राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाचा समावेश आहे. ‘आम्ही दोघी’ या चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन भाग्यश्री जाधव यांचे आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदíशत होत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 1:14 am

Web Title: sanjay narvekar chala hawa yeu dya
Next Stories
1 मामि अगणित स्वप्नांची दिवाळी
2 सुटकापट!
3 VIDEO : जेव्हा कपिल शर्मा ‘फिरंगी’ होतो
Just Now!
X