News Flash

Photo: संजय नार्वेकर ‘बिग बॉस’च्या घरात

'बिग बॉस मराठी २'च्या घरात नव्या पाहुण्याची एण्ट्री..

संजय नार्वेकर

‘बिग बॉस मराठी’च्या घरात मंगळवारी पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये नेहाने घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकावला. तर हीनाने केलेल्या चुकीची खूप मोठी किंमत तिला मोजावी लागली. आता या घरात एका नव्या पाहुण्याची एण्ट्री होणार आहे. हा नवा पाहुणा आहे अभिनेता संजय नार्वेकर.

‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटाची टीमच बिग बॉसच्या घरात येणार आहे. संजय नार्वेकर, स्मिता गोंदकर, पुष्कर श्रोत्री, मृण्मयी गोडबोले हे कलाकार घरातील स्पर्धकांसोबत थोडा वेळ घालवणार आहेत. स्पर्धकांशी ते गप्पा मारणार आहेत. ही सर्व गंमत बिग बॉस मराठीच्या आगामी एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Video : कोल्हापुरात गुडघाभर पाण्यात राणादा आणि पाठक बाई

कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणाऱ्या अण्णा आणि त्याचे अतरंगी साथीदार यांची गोष्ट ‘ये रे ये रे पैसा २’ मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 3:34 pm

Web Title: sanjay narvekar in bigg boss marathi 2 house ssv 92
Next Stories
1 ‘बिग बॉस १३’मध्ये दिसणार ‘हे’ स्पर्धक?
2 Video : कोल्हापुरात गुडघाभर पाण्यात राणादा आणि पाठक बाई
3 नेहामुळे माधव घराबाहेर? शिवानीचा आरोप
Just Now!
X