करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनअंतर्गत तयार झालेला ‘कलंक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा टीझर समोर आला. टीझर लॉन्चवेळी चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती. यावेळी बोलताना संजय दत्त म्हणाला, ‘माझ्या कपाळावर एक कलंक होता. मात्र आता तो पुसला गेला आहे.’ १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटोमध्ये संजय दत्तला दोषी ठरविण्यात आलं होतं. याप्रकरणी त्याला शिक्षाही ठोठावण्यात आली होती. या हल्ल्यात दोषी ठरविण्यात आल्यामुळे हा माझ्या माथ्यावरील ‘कलंक’च होता असं संजयने म्हटलं आहे.

‘कलंक’ या चित्रपटात आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर ही स्टारमंडळी झळकणार आहे. नुकताच या चित्रपटातील भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. तगडी स्टार, भव्य दिव्य सेट आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील कथानक यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही जोडी अनेक वर्षानंतर एकत्र पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझर लॉन्च वेळी प्रसार माध्यमांनी संजयला काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तर देताना त्याने ‘माझ्या माथ्यावरील कलंक पुसला गेला आहे’,असं त्याने म्हटलं.

“तुमच्या माथ्यावर लागलेला असा कोणता ‘कलंक’ आहे,जो तुम्ही दूर करु इच्छिता”, असा प्रश्न संजयला विचारण्यात आला होता यावर उत्तर देतांना, “हो. माझ्या माथ्यावर एक ‘कलंक’ होता. मात्र आता तो पुसला गेला आहे”, असं संजयने यावेळी म्हटलं.

दरम्यान, संजयचं हे उत्तर अप्रत्यक्षरित्या १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी होतं. या स्फोटाप्रकरणी संजयला दोषी ठरविण्यात आलं होतं. त्यासोबतच त्याला पाच वर्षाची शिक्षाही सुनावण्यात आली होती. या हल्ल्यानंतर संजयवर अनेक स्तरातून टीका झाली होती. त्यामुळे हा त्याच्या माथ्यावर लागलेला कलंकच होता असं त्याने स्पष्टपणे म्हटलं आहे.