सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरमधील एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री संजना गलरानी हिला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी पोलिसांनी तिच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सुरुवातीला या प्रकरणी अभिनेत्री राघिनी द्विवेदी आणि तिचा मित्र रवीशंकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. चौकशीदरम्यान संजना गलरानीचं नाव समोर आलं. परिणामी तिला अटक करण्यात आली आहे.
सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरमधील एका ड्रग्स रॅकेटच्या अड्ड्यावर छापा टाकला होता. या ठिकाणी त्यांना एक डायरी सापडली होती. या डायरीमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील १५ सेलिब्रिटींची नावं आहेत. डायरीमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आठ सप्टेंबरला पोलिसांनी राघिनी द्विवेदी हिच्या घरी छापा टाकला व तिला अटक केली. त्यानंतर चौकशीदरम्यान संजना गलरानीचं नाव समोर आलं. परिणामी तिला देखील अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणात चौकशी सुरु आहे. तसंच या प्रकरणाचे सुत्रधार विदेशात असल्याचा संशय त्यांना आहे. या ड्रग्स गँगमध्ये संजनाची भूमिका काय आहे? याचा तपास आता केला जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2020 5:38 pm