18 January 2021

News Flash

Sanju Box Office Collection : अवघ्या सात दिवसांत पार केला २०० कोटींचा आकडा

सात दिवसांत 'संजू'ने २०२.५१ कोटी रुपयांंचा गल्ला जमवला आहे.

'संजू'

गेल्या शुक्रवारी बहुचर्चित ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अवघ्या सात दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. राजकुमार हिरानी यांचं दिग्दर्शन आणि रणबीर कपूरच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली असून ‘संजू’ने २०० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे.

पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर रेकॉर्ड मोडत आहे. सात दिवसांत ‘संजू’ने २०२.५१ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. रणबीरच्या करिअरमधील हा सर्वांधिक गाजलेला चित्रपट ठरला आहे. कारण ‘दंगल’, ‘टायगर जिंदा है’ आणि आता ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. इतकंच नव्हे तर ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमसुद्धा ‘संजू’ने मोडला आहे.

वाचा : ‘संजू’मध्ये न दाखवण्यात आलेल्या सत्याचं काय? – उज्ज्वल निकम

अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित या चित्रपटात रणबीरसोबतच विकी कौशल, परेश रावल, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, जिम सर्भ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सात दिवसांची कमाई-

शुक्रवार- ३४.७५ कोटी रुपये
शनिवार- ३८.६० कोटी रुपये
रविवार- ४६.७१ कोटी रुपये
सोमवार- २५.३५ कोटी रुपये
मंगळवार- २२.१० कोटी रुपये
बुधवार- १८.९० कोटी रुपये
गुरुवार- – १६.१० कोटी रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 5:14 pm

Web Title: sanju box office ranbir kapoor rajkumar hirani film crosses rs 200 crore mark in 7 days
Next Stories
1 ‘संजू’ने मोडला ‘थ्री इडियट्स’चा रेकॉर्ड
2 मराठी चित्रपटात भूमिका साकारायला आवडेल- अक्षय कुमार
3 Fanney Khan trailer : स्वप्नपूर्तीसाठी धडपडणाऱ्या बाप- लेकीच्या अतूट नात्याचा प्रवास
Just Now!
X