22 January 2021

News Flash

‘संजू’ने मोडला ‘थ्री इडियट्स’चा रेकॉर्ड

आमीर खानच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटाने एकूण २०२.४७ कोटींची कमाई केली होती

रणबीर कपूरच्या ‘संजू’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. फक्त सात दिवसांत संजू चित्रपटाने २०० कोटींहून जास्त कमाई केली आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने आतापर्यंत २०२.५१ कोटींची कमाई केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संजू’ने राजकुमार हिरानी यांच्याच ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. आमीर खानच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाने एकूण २०२.४७ कोटींची कमाई केली होती. ‘संजू’ चित्रपटाने २०२.५१ कोटींची कमाई करत आघाडी घेतली आहे.

तरण आदर्श यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे की, ‘संजू चित्रपटाने शुक्रवारी ३४.७५ कोटी, शनिवारी ३८.६० कोटी, रविवारी ४६.७१ कोटी, सोमवारी २३.३५ कोटी, मंगळवारी २२.१० कोटी, बुधवारी १८.९० कोटी आणि गुरुवारी १६.१० कोटींची कमाई केली आहे’.

सात दिवसांच्या आत २०० कोटींहून जास्त कमाई करणार संजू तिसरा चित्रपट ठरला आहे. संजूच्या आधी बाहुबली-2′ आणि ‘टायगर जिंदा है’ने हा रेकॉर्ड केला आहे. यासोबतच २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा रणबीरचा हा पहिला चित्रपट ठरला आहे. ज्याप्रकारे संजू चित्रपटाची घोडदौड सुरु आहे ते पाहता लवकरच चित्रपट ३०० कोटींची कमाई करेल असा अंदाज तरण आदर्श यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 4:57 pm

Web Title: sanju brekas record of 3 idiots earn 202 51 crores
Next Stories
1 मराठी चित्रपटात भूमिका साकारायला आवडेल- अक्षय कुमार
2 Fanney Khan trailer : स्वप्नपूर्तीसाठी धडपडणाऱ्या बाप- लेकीच्या अतूट नात्याचा प्रवास
3 ‘संजू’मध्ये न दाखवण्यात आलेल्या सत्याचं काय? – उज्ज्वल निकम
Just Now!
X