मराठी साहित्यात विनोदी कथानकांचा सिंहाचा वाटा आहे. पु. ल. देशपांडे, चि. वी. जोशी, व. पू. काळे इथपासून अगदी दिलीप प्रभावळकरांपर्यंत अनेक लेखकांनी आपल्या दर्जेदार कथानकातून, चित्रपटांतून, नाटकांमधून, कविता व गाण्यांमधून रसिकांना खळखळवून हसवले आहे.

त्यांनी आपल्या कमालीच्या निरिक्षणातून निर्माण केलेले विनोद निर्मळ असायचे. अगदी या लेखकांचे ७०च्या दशकातील विनोदही आत्ताच्या घडीला जसेच्या तसे लागू पडतात. परंतु हल्लीच्या विनोदांचा दर्जा घसरत चालला आहे. हल्लीच्या विनोदी चित्रपट, मालिका, नाटक व रिअॅलिटी शोमध्ये बऱ्याचदा कमरेखालचे विनोद केले जातात. त्यामुळे सध्याच्या कलाकारांना निर्मळ विनोद करताच येत नाही असे विनोद ज्यांचा आनंद संपूर्ण कुटुंब एकत्र बसून घेऊ शकते अशी टीका वारंवार केली जाते. या टीकेवर मराठी अभिनेता, लेखक, निर्माता संकर्षण कऱ्हाडे याने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ या कार्यक्रमात आपली प्रतिक्रिया दिली.

तुम्ही संकर्षण कऱ्हाडेच्या या मताशी सहमत आहात का? या व्हिडीओवर आपल्या कॉमेंट करुन रिप्लाय द्या.