09 July 2020

News Flash

यंदा वारी नाही म्हणे, खरं हाय का? पंढरीच्या विठूरायासाठी संकर्षणची खास कविता

पाहा व्हिडीओ

आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला माहित असते ती म्हणजे पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात. पण यंदा करोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना वारीला जाता येणार नाही. अशातच अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने पंढरीच्या विठूरायावर सुंदर कविता लिहिली आहे.

संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पंढरीच्या विठूरायावर सुंदर कविता ऐकवली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने “पंढरीच्या विठूराया… पाहा.. नीट ऐका.. तुम्हालाही ह्या रुपात पांडुरंग दिसला असेल तर; नक्की कळवा ..!! रामकृष्ण हरी..” असे कॅप्शन दिले आहे.

आषाढीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करुन वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे म्हटले जाते. पण यंदा करोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना वारीला जाता येणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 7:09 pm

Web Title: sankarshan karhade poem on ashadi ekadashi avb 95
Next Stories
1 या सुपरस्टारने ‘दीवाना’ चित्रपटासाठी सुचवले होते शाहरुख खानचे नाव
2 हुमा कुरैशीला वीज बिलाचा झटका, ट्विट करत म्हणाली…
3 फोटोचं फिमेल व्हर्जन व्हायरल झाल्यावर सुनील लहरी म्हणतात….
Just Now!
X