News Flash

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत संक्रांतीचा सण होणार साजरा

पहिल्या संक्रांतीला कीर्ती जिंकू शकेल का जीजी अक्कांचं मन?

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. कीर्तीची पहिलीच संक्रांत असल्यामुळे काळी साडी, हलव्याचे दागिने अशी साग्रसंगीत तयारी करण्यात आली आहे. जीजी अक्कांनी कीर्तीला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. या पंधरा दिवसांत जर कीर्ती स्वत:ला सिद्ध करु शकली नाही तर तिला घर सोडून जावं लागणार आहे.

कीर्तीसाठी हे १५ दिवस निर्णायक असणार आहेत. या पंधरा दिवसांचं काऊण्टडाऊन याआधीच सुरु झालं आहे. त्यामुळे कीर्तीकडे आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.

खरंतर संक्रांतीचा सण म्हणजे आपापासातले हेवेदावे विसरायला लावणारा दिवस. तीळगुळाच्या गोडीप्रमाणेच नात्यातलाही गोडवा वाढवणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे. संक्रांतीच्या मुहुर्तावर कीर्ती जीजी अक्कांचं मन जिंकू शकेल का हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 1:07 pm

Web Title: sankrant celebration in phulala sugandh maticha serial ssv 92
Next Stories
1 ‘डॉक्टर डॉन’च्या सेटवर शेकोटी, गप्पा आणि बरंच काही…
2 आर्थिक संकटामुळे करावे लागले होते ‘ते’ चित्रपट; अनिल कपूर यांचा खुलासा
3 शाहिद कपूर सोशल मीडियावर मागतोय काम; पत्नी मीराला ठरवलं जबाबदार
Just Now!
X