News Flash

‘रफ अॅण्ड टफ’ संतोष

सिनेसृष्टीत आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.

सिनेसृष्टीत आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. असाच आपल्या मेहनतीच्या जोरावर तावून-सलाखून निघालेला कलाकार म्हणजे संतोष जुवेकर. तो सर्वप्रथम मालिकांतून घराघरांत पोहचला. त्यानंतर एकामागून-एक उत्तोमोत्तम चित्रपटांतून दिसणारा संतोष आता‘बायकर्स अड्डा’ या आगामी मराठी चित्रपटातून ‘बायकर’च्या हटके भूमिकेतून आपल्या भेटीस येत आहे. श्री नवकार फिल्म्स प्रस्तुत ‘बायकर्स अड्डा’ ९ ऑक्टोबरपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
मॉडिफाईड बाईक्स, फॅशनेबल जॅकेट्स, अंगावर वेगवेगळे टॅटूज्,नजरेत उन्मादकता आणि वागण्यात बेफिकिरी दर्शवणाऱ्या संतोषच्या लूकची सध्या चर्चा होत आहे.या भूमिकेसाठीसंतोष जुवेकरने बरीच मेहनत घेतली असून यातली बरीचशी साहसदृश्ये त्याने स्वतःच केली आहेत. आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा संतोषचीबायकर्स अड्डा’ चित्रपटातील भूमिका फारच वेगळी व हटके आहे.विजय हरिया आणि प्रमोद लोखंडे निर्मित‘बायकर्स अड्डा’ तरुणाईने चोखंदळलेल्या नव्या वाटांना उलगडून दाखवतो. तरुणांमध्ये असलेले बाईक्सचंवेड दिग्दर्शक राजेश लाटकर यांनी अचूक टिपलंय.
‘बायकर्स अड्डा’ हा चित्रपट वाऱ्याशी झुंज घेणाऱ्या बायकर्सच्या जीवनावर आधारलेला आहे. या चित्रपटामध्ये संतोष जुवेकरची ‘विकी’ नामक मध्यवर्ती भूमिका असून रफ अँड टफ संतोष ‘बायकर’ म्हणून परफेक्ट चॉईस ठरलाय.आजवर विविध धाटणींच्या चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकणारा संतोष आता ट्रॅकवर रेस जिंकण्यास सज्ज झालाय.
संतोष जुवेकर आणि प्रार्थना बेहेरेसोबत कुशल बायकर्सही या चित्रपटाद्वारे आपल्या भेटीस येणार आहेत. श्रीकांत मोघे, श्रीकांत वट्टमवार, राहुलराज डोंगरे, हृषीकेश मांडके, जय आदित्य गिरी, अनिरुद्ध हरीप, देवेंद्र भगत आणि निखिल राजेशिर्के या साहसी बायकर्सचेअचंबित करणारे स्टन्टस् आणि वेगवान,उत्कंठावर्धक रेसहे ‘बायकर्स अड्डा’ या सिनेमाचं वैशिष्ट्य ठरणार आहे. बायकिंगचं थ्रील अनुभवण्यासाठी९ ऑक्टोबपासून प्रदर्शित होणारा‘बायकर्स अड्डा’ नक्कीच पहायला हवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 1:04 pm

Web Title: sanotsh juvekars bikers adda releasing on 9th october
Next Stories
1 .. या मराठी चित्रपटाचे होणार क्रुझवर चित्रीकरण!
2 मराठी चित्रपटांना अॅक्शनची भुरळ
3 पुरूषाच्या संघर्षाची आणि बाईच्या अंतरंगाची आगळी वेगळी कथा
Just Now!
X