08 July 2020

News Flash

हॅरी पॉटर पडला ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात; दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'या' बॉलिवूड अभिनेत्रीने पाडली 'हॅरी पॉटर'वरही भूरळ

आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सान्या मन्होत्रा सध्या ‘हॅरी पॉटर’मुळे चर्चेत आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता डॅनियन रॅडक्लिफ उर्फ याने ‘हॅरी पॉटर’ याने सान्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाला हॅरी पॉटर?

डॅनियल आणि सान्या या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. ‘दंगल’ चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये तिने डॅनियलचा उल्लेख केला होता. या दोघांच्या मैत्रीच्या प्रत्यय पुन्हा एकदा चाहत्यांना आला आहे. डॅनियलने तिला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सान्याला शुभेच्छा देणारा एक व्हिडीओ इन्स्टा स्टोरी म्हणून पोस्ट केला आहे.

डॅनियलने सान्यासाठी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे ‘हॅरी पॉटर’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

‘हॅरी पॉटर’ ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. १० वर्षांपूर्वी या मालिकेतील शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये डॅनियन रॅडक्लिफने हॅरी पॉटर ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 6:34 pm

Web Title: sanya malhotra gets birthday wish from harry potter mppg 94
Next Stories
1 Video : प्रवीण तरडे मराठीत सर्वाधिक मानधन घेतात का? पाहा ते काय म्हणतात..
2 ‘तान्हाजी’ची कमाई सुरूच; नवे चित्रपटही पडतायत फिके
3 ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीवर बलात्काराचा प्रयत्न; आपबिती ऐकून तीन दिवस जेवली नाही आई
Just Now!
X