News Flash

‘दंगल’च्या सान्याचा हा एसआरके अवतार पाहिला का?

शाहरुखच्या गाण्यावर त्याचीच सिग्नेचर पोज करताना दिसत आहे

अभिनेत्री सान्या मल्होत्रा

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या ‘दंगल’ सिनेमाची अभिनेत्री सान्या मल्होत्राने तिचा एक मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सान्या, शाहरुख खानच्या गाण्यावर त्याचीच सिग्नेचर पोज करताना दिसत आहे.

सान्या, शाहरुखच्या २००६ मध्ये आलेल्या ‘कभी अलविदा ना कहना’ या सिनेमातल्या ‘मितवा’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. दरम्यान, सध्या ‘दंगल’ हा सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. २०१६ या वर्षामध्ये प्रदर्शित झालेल्या विविध सिनेमांमध्ये आमिरच्या ‘दंगल’ या सिनेमाने चांगलीच बाजी मारली आहे. अनेक सिनेमांच्या कमाईच्या आकड्याला पिछाडत ‘दंगल’ या सिनेमाने तिकीटबारीवर २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. २३ डिसेंबर २०१६ ला प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ या सिनेमात आमिर खान, साक्षी तन्वर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, झायरा वसिम आणि सुहानी भटनागर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या ६२ व्या फिल्मफेअर पुरस्काराची लोकांमध्ये उत्सुकता लागून राहिली असताना या मानाच्या पुरस्कारासाठीची नामांकन  यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे ६२ व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार आणि आमिर खानच्या ‘दंगल’मधील धाकड मुलींसह ‘अलिगढ’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या  मनोज वाजपेयी याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. ‘एअरलिफ्ट’ चित्रपटातील दमदार भूमिकेनंतरही अक्षय कुमारला नामांकन मिळाले नसल्यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. परिणामी सोशल मीडियावर अक्षय कुमारकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होताना दिसतेय.

फिल्मफेअर २०१६ च्या नामांकनामध्ये ‘दंगल’च्या अभिनयामूळे आमिर खानला नामांकन मिळाले असले तरी या चित्रपटामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 8:33 pm

Web Title: sanya malhotra recreat shah rukh khan song mitwa from kabhi alvida naa kehna
Next Stories
1 ‘फिल्मफेअर’च्या शर्यतीतून खिलाडी बाद; ‘धाकड’ मुलींकडेही दुर्लक्ष
2 PHOTO: बाबांसारखाच अब्रामही मुलींमध्ये प्रसिद्ध
3 जर जलीकट्टूवर बंदी घातली तर बिर्याणीवरही घाला- कमल हसन
Just Now!
X