News Flash

दंगल गर्ल चटणी करायला गेली अन् थेट रुग्णालयात पोहोचली

लॉकडाउनमध्येच करावी लागली शस्त्रक्रिया

‘दंगल’ चित्रपटातून नावारुपास आलेली सान्या मल्होत्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती चक्क चटणीमुळे चर्चेत आहे. होय, स्वयंपाकगृहात चटणी तयार करणं तिला खूपच महागात पडलं आहे. या चटणीमुळे तिला उपचारासाठी थेट रुग्णालयात जावं लागलं आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार चटणी बनवण्याच्या नादात सान्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. चटणी बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तिने मिक्सरच्या भांड्यात टाकल्या. परंतु त्या भांड्याचे झाकण लावण्यापूर्वीच तिने स्विच ऑन केला. परिणामी सर्व वस्तू बाहेर उडू लागल्या. या वस्तूंना पकडण्याच्या नादात तिने थेट मिक्सरच्या भांड्यात हात घातला. दरम्यान मिक्सरच्या ब्लेडमुळे तिच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान सान्याच्या बोटाची एक लहानशी शस्रक्रिया देखील करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

Mah house mah rulezzzz @harshita02

A post shared by Sanya Malhotra (@sanyamalhotra_) on

रुग्णालयात सान्याची करोना चाचणी देखील घेण्यात आली. परंतु आनंदाची बाब म्हणजे तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. सान्याचे संपूर्ण कुटुंब दिल्लीमध्ये आहे. ती एकटीच मुंबईमध्ये राहात आहे. लॉकडाउनमुळे ती मुंबईत अडकली आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना सान्याची काळजी वाटत आहे. सान्याला दिल्लीमध्ये येण्याची परवानगी द्यावी यासाठी कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 3:00 pm

Web Title: sanya malhotras little finger sliced off by blender mppg 94
Next Stories
1 ४२० रुपयांचा सोनू सूदचा १९९७ सालातील लोकल ट्रेनचा पास व्हायरल, कारण की…
2 पोलिसांच्या सुरक्षेसाठी भाईजानचा पुढाकार; , मुंबई पुलिसांसाठी दिले खास सॅनिटायझर
3 टिक-टॉकचं रेटिंग पुन्हा ४.४ वर; गुगलने ‘अशी’ केली मदत
Just Now!
X