News Flash

‘या’ बॉलिवूडमधील सिनेमांत दिसणार ‘बिग बॉस’ स्पर्धक सपना चौधरी

तिच्यासोबत अभय देओल आणि पत्रलेखा ही असणार आहे

‘या’ बॉलिवूडमधील सिनेमांत दिसणार ‘बिग बॉस’ स्पर्धक सपना चौधरी
सपना चौधरी

‘बिग बॉस ११’ मध्ये आपल्या परफॉर्मन्सने चाहत्यांची मनं जिंकणारी डान्सर सपना चौधरीला आता एक बॉलिवूड सिनेमात काम करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सिनेमाचे नाव आहे ‘नानू की जानू’. या सिनेमात तिच्यासोबत अभय देओल आणि पत्रलेखा ही असणार आहे. सिनेमात प्रेमाचा अनोखा त्रिकोण दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच मुंबईत सुरू झाले आहे.

‘बिग बॉस’मुळे घराघरात पोहोचलेल्या सपनाच्याच नावाची सध्या चर्चा होताना दिसत आहे. याआधी सपनाचे ‘लव बाईट’ हे गाणेही प्रदर्शित झाले आहे. भांगोवर या सिनेमातील हे गाणे हिटही झाले आहे. येत्या १५ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. हे तर झाले एका सिनेमातील आटम नंबरचे. सपनाचे ‘टॅटू’ या आगामी गाण्याचा टिझरही नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. लोकांना गाण्याचा टिझर आवडला आहे.

हरियाणातील प्रसिद्ध डान्सर अशी सपना चौधरीची ओळख आहे. बिग बॉस शोमधून बाहेर पडल्यानंतर, मी फार आनंदी आहे. मी माझ्यासोबत अशा आठवणी घेऊन जात आहे, ज्या आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. या घरात राहिलेल्या साऱ्यांनाच मला पुन्हा भेटायला आवडेल.
मनात कोणाबद्दलही कटुता नाही. या घरात राहणारा प्रत्येकजण आपल्या जागी योग्य आहे, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपना म्हणाली होती.

सपनाच्या मते, टीव्ही निर्माता विकास गुप्ता ‘बिग बॉस’चे हे ११ वे पर्व जिंकू शकतो असे वाटते. मी डान्सर आहे याचा अर्थ हा नाही की, मी चांगली मुलगी नाही. या शोमध्ये प्रत्येकानेच मला तो मान दिला. मी सर्वांनाच मनापासून धन्यवाद म्हणते. यामधून बाहेर पडल्यावर तुम्हाला काम मिळण्यास सुरूवात होते. मी या शोची एक भाग होऊ शकले याचाच मला आनंद आहे, असे सपनाने म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 1:18 am

Web Title: sapna chaudhary abhay deol bollywood film nanu ki janu
Next Stories
1 Year End Special 2017: यावर्षी या कलाकारांनी घेतला संसारातून काडीमोड
2 अरे, हा राणादा नव्हं!
3 ‘करिना तुझा अभिमान वाटतो’
Just Now!
X