04 March 2021

News Flash

‘विरुष्काच्या बाळाला नेपोकिड म्हणणार का?’ घराणेशाहीच्या वादात साकिब सलीमची उडी

विराट-अनुष्काच्या होणाऱ्या बाळानं काय व्हावं क्रिकेटपटू की कलाकार?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियाद्वारे स्टार किड्सवर जोरदार टीका होत आहे. त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेता साकिब सलिम याने उडी मारली आहे. विराट आणि अनुष्काचं होणारं बाळ कलाकार होवो किंवा क्रिकेटपटू तुम्ही त्याला नेपोकिड्सच म्हणणार का? असा सवाल त्याने टीकाकारांना केला आहे.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत साकिबने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य केलं. “प्रत्येक व्यक्तीला स्ट्रगल हे करावंच लागतं. इतर कलाकारांप्रमाणे स्टार किड्सला देखील चित्रपट उद्योगात टिकून राहण्यासाठी मेहनत करावी लागते. तुम्हाला ओळखीवर सुरुवातीला एक दोन चित्रपट मिळतात पण ते जर फ्लॉप झाले तर कोणीही काम देत नाही. त्यामुळे उगाचच स्टार किड्सला दोष देणं चुकीचं आहे.” अशा शब्दात त्याने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. लक्षवेधी बाब म्हणजे टीकाकारांना प्रत्युत्तर देताना त्याने विराट आणि अनुष्काच्या होणाऱ्या बाळाचंही उदाहरण दिलं. “टीकाकारांचा विचार करता विराट-अनुष्काच्या होणाऱ्या बाळाने मग काय व्हावं? क्रिकेटपटू की कलाकार? कारण दोन्ही परिस्थितीत तुम्ही त्याला घराणेशाहीच म्हणणार.” असा उपरोधिक टोलाही साकिबने लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 4:53 pm

Web Title: saqib saleem nepotism debate virat kohli anushka sharm mppg 94
Next Stories
1 मृण्मयी देशपांडेचा ‘बोगदा’ हा चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
2 कुलकर्ण्यांच्या घरी दसऱ्याची लगबग; आसावरी देणार अभिजीत राजेंना खास गिफ्ट
3 संजय दत्त कॅन्सरमुक्त; चाहत्यांचे मानले आभार
Just Now!
X