सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत असतानाच सरतं वर्ष काही बॉलिवूड स्टारकिड्ससाठी करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलं. जान्हवी कपूर, सारा अली खान, इशान खट्टर यांसारख्या स्टारकिड्सचं कलाविश्वात पदार्पण झालं. एकीकडे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ची जोरदार चर्चा होत असतानाच सारा अली खानसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या डेब्यूटंट चार्टवर साराने सर्वाधिक लोकप्रिय ‘डेब्यूटंट ऑफ द इअर’चा किताब पटकावला आहे.
करण जोहरच्या ‘धडक’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरला मागे टाकत साराने पहिले स्थान पटकावले आहे. सारासोबतच इशान खट्टरसाठीही हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरलं. कारण अभिनेत्यांमध्ये इशानची लोकप्रियता सर्वाधिक आहे. २०१८ मध्ये साराचे ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. तर इशानचेही ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ आणि ‘धडक’ असे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.
Photo : नववर्षाच्या पूर्वसंध्येला सोनाली बेंद्रेची प्रेरणादायी पोस्ट
बॉलिवूड अभिनेत्रींच्या २०१८च्या रँकिंगमध्ये डिजिटल न्यूज़मध्ये साराचा तिसरा क्रमांक लागतो. तर न्यूज़पेपर रँकिंगमध्ये सारा दूस-या स्थानावर आहे. व्हायरल न्यूज़ रँकिंगमध्ये ती पाचव्या पदावर आहे. तर साराची प्रतिस्पर्धक मानली जाणारी जान्हवी डिजिटल न्यूजमध्ये नवव्या क्रमांकांवर आहे. न्यूजपेपर रँकिंगमध्ये दहाव्या आणि वायरल न्यूज रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर आहे.
अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, ‘सारा आणि जान्हवी दोघींच्या पहिल्या सिनेमाने भरपूर लोकप्रियता मिळवली नव्हती. मात्र साराच्या बाबतीत तिच्या दुस-या सिनेमाने ही कसर भरून काढली. ‘सिम्बा’मुळे साराच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली.’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 7:23 pm