सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि सेलिब्रिटी किड असल्याने सतत चर्चेत कसं राहायचं यामागचं गमक तिला अत्यंत चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली सारा आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा तिचा सहकलाकार रणवीर सिंगने नुकतीच तिची सर्वांत मोठी इच्छा पूर्ण केली होती. ही इच्छा होती अभिनेता कार्तिक आर्यनला भेटायची. ‘कॉफी विथ करण’ या मध्ये तिने कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि रणवीर तिच्या मदतीला धावून आला. सध्या बॉलिवूडमध्ये कार्तिक आणि सारा ही नवीन जोडी खूपच चर्चेत आहे. याच चर्चेचा फायदा घेत दिग्दर्शक इम्तियाज अलीनेही त्याच्या आगामी चित्रपटासाठी या दोघांना विचारलं आहे.

२००९ साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला. यामध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका होती. आता त्याच चित्रपटाच्या सिक्वलमध्ये सारा-कार्तिक मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/BrlHn3UjcSf/

https://www.instagram.com/p/BrmfCQZA7Vr/

वाचा : ‘साऊथ सेन्सेशन’ विजय देवरकोंडा रणवीरच्या चित्रपटातून करणार बॉलिवूड पदार्पण 

‘फिल्मफेअर’ या प्रसिद्ध मासिकेला दिलेल्या मुलाखतीत खुद्द इम्तियाजने याबद्दलची माहिती दिली. माच्या टीमने ‘लव्ह आज कल’च्या सिक्वलवर काम सुरु केले आहे. यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे, तर त्याच्यासोबत नायिकेसाठी साराचे नाव निश्चित केले आहे, असे इम्तियाजने सांगितले. त्यामुळे या नवीन जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील.