अभिनेत्री करीना कपूर नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. रविवारी सकाळी करीनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यामुळे सध्या करीनावर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे करीनाच्या बाळाचा जन्म होण्यापूर्वीच अनेक चाहत्यांनी या बाळासाठी खास गिफ्ट पाठवल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामध्येच आता अभिनेत्री सारा अली खानने करीना आणि बाळासाठी खास गिफ्ट घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या सोशल मीडियावर साराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारा करीनाच्या घरी जाताना दिसत असून तिच्या हातात खास बाळासाठी आणि करीनासाठी भेटवस्तू असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ विरल भैय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, करीना आणि सारा या दोघींमध्ये चांगली मैत्री आहे. अनेकदा या दोघी एकमेकींच्या फॅशन टीप्स शेअर करत असतात. बऱ्याच वेळा या दोघीही त्यांच्यातील नात्याविषयी उघडपणे व्यक्त झाल्या आहेत. करीनानेही साराला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी मदत केली होती. विशेष म्हणजे सारा आणि तैमुर या दोघांमध्येही चांगली गट्टी असल्याचं पाहायला मिळतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 25, 2021 4:16 pm