01 June 2020

News Flash

लेडी इन लंका! साराचा हॉट लूक पाहिलात का?

साराने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या सारा तिचा आगमी चित्रपट ‘कूली नंबर १’ च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन सारासोबत दिसणार आहे. सारा आणि वरुणला एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. पण सारा तिच्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून सध्या श्रीलंकेमध्ये सुट्यांचा आनंद लुटताना दिसताने.

साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रीलंकेमध्ये सुट्यांचा आनंद घेत असल्याचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सारा समुद्र किनारी दिसत आहे तर एका फोटोमध्ये स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत होती. दरम्यान तिकडे पाऊस देखील पडत असल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये साराने काळ्य रंगाची बिकिनी परिधान केल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये सारा अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे. श्रीलंकेतील हे फोटो शेअर करत साराने ‘लेडी इन लंका’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

Lady in Lanka

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

आणखी वाचा : सारा- कार्तिकचं ब्रेकअप? काय आहे कारण…

साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी साराला आयफा अवॉर्ड २०१९मध्ये बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला आहे. आता लवकरच सारा वरुण धवनसह ‘कूली नंबर १’ चित्रपटात झळकणार आहे. ‘कुली नंबर १’ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेमध्ये झळकले होते. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनीच केलं असून ‘कुली नंबर १’ च्या रिमेकची जबाबदारीदेखील त्यांनीच घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2019 11:30 am

Web Title: sara ali khan hot look on srilanka beach avb 95
Next Stories
1 ‘मुन्नाभाई’च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका
2 …अखेरच्या क्षणी मोडलं सलमानचं लग्न; साजिदनं सांगितला घडलेला प्रसंग
3 Video : खऱ्या आयुष्यात ‘या’ दोन व्यक्तींना ट्रिपल सीट न्यायला आवडेल- अंकुश चौधरी
Just Now!
X