News Flash

बरं झालं आई-बाबांनी घटस्फोट घेतला- सारा अली खान

या मुलाखतीत सारा तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत मनमोकळेपणाने व्यक्त झाली.

दमदार अभिनयासोबतच बिनधास्त बोलण्यासाठी सारा अली खान ओळखली जाते. तिने दिलेल्या उत्तरांमुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सारा तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत मनमोकळेपणाने व्यक्त झाली. गुदमरत राहण्यापेक्षा बरं झालं की माझ्या आई-बाबांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला, असं ती म्हणाली.

या मुलाखतीत साराला आई आणि वडिलांमध्ये कोणाचा जास्त प्रभाव तुझ्यावर आहे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “वडिलांवर माझं खूप प्रेम आहे. पण आई माझी प्रेरणा आहे. आम्ही एकमेकींशी मैत्रिणीसारखे वागतो. ती माझं सर्वस्व आहे.”

आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल दु:ख वाटतं का असा प्रश्न विचारला असता ती निर्भीडपणे म्हणाली, “मी देवाचे आभार मानते की माझ्या आई-बाबांनी घटस्फोट घेतला. आपल्या मुलांसाठी पालक एकमेकांसोबत मन मारून राहतात असं मी अनेकांना बोलताना ऐकलंय. पण जर तुम्ही स्वत: आनंदी राहू शकला नाहीत तर तुम्ही तुमच्या मुलांना सुखी कसं ठेवणार? असं गुदमरत राहणं कोणालाच आवडत नाही आणि त्याचा फायदाही कोणाला होत नाही. गुदमरत जगण्यापेक्षा माझ्या आई-बाबांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.. ते बरंच झालं. एका दु:खी घरापेक्षा आता माझ्याकडे दोन आनंदी घरं आहेत.”

आणखी वाचा : मराठी अभिनेत्रीने बांधली मल्याळम अभिनेत्याशी लग्नगाठ

अमृता सिंग आणि सैफने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन १९९१ मध्ये लग्न केलं. पण त्यानंतर फार काळ त्यांचा संसार टिकला नाही. अखेर २००४ मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१२ मध्ये सैफ आणि अभिनेत्री करीना कपूर विवाहबंधनात अडकले. करीना ही सैफपेक्षा दहा वर्षांनी लहान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 1:11 pm

Web Title: sara ali khan is blissful together with her dad and mom divorce ssv 92
Next Stories
1 मादाम तुसाँमध्ये स्थान मिळवणारी ‘सिंघम’ फेम काजल ठरली पहिली दाक्षिणात्य अभिनेत्री
2 2 States : मराठी अभिनेत्रीने बांधली मल्याळम अभिनेत्याशी लग्नगाठ
3 तारा सुतारियाच्या घरी वाजणार सनई-चौघडे; करीना होणार नणंदबाई?
Just Now!
X