बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन एकत्र डिनरला जाता किंवा फिरताना दिसत होते. त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले. आता साराचे नाव दक्षिणात्य सुपरस्टारशी जोडलं जातं आहे.
दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा आणि सारा यांना बऱ्याच वेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. पण खरचं ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांसमोर आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने काही दिवसांपूर्वी एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी सारा आणि विजय पार्टीमध्ये पूर्णवेळ सोबत होते. या पार्टीला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र विजय आणि साराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
View this post on Instagram
दरम्यान, सारा आणि विजय चित्रपटासाठी एकत्र येत असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. विजयचा ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजयसोबत अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करणार असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 7:19 pm