27 February 2021

News Flash

मित्र-मैत्रिणींसोबत गाणं गाणाऱ्या सारा अली खानचा व्हिडिओ व्हायरल

सारा गाणं गात आहे तर तिचा मित्र गिटार वाजवत आहे

सारा अली खान

सारा अली खानचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. सारा ‘आशिकी २’ मधील ‘तुम ही हो’ हे गाणे गाताना दिसत आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी २’ सिनेमातील तुम ही हो हे गाणे तरुणांमध्ये आजही फार प्रसिद्ध आहे. हेच गाणं गाताना सारा मित्र- मैत्रिणींसोबत मजा- मस्ती करताना दिसत आहे. सारा गाणं गात आहे तर तिचा मित्र गिटार वाजवत आहे. बॉलिवूड नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहताना तो फार जुना असल्याचे दिसून येते. कारण यात सारा पूर्णपणे वेगळी दिसत आहे. साराने स्वतःच्या फिगरवर फार मेहनत घेतली असून ती आता बरीच बारिक झाली आहे. पण या व्हिडिओमध्ये ती थोडीशी जाड दिसत आहे.

‘ओम शांती ओम’ नव्हे, तर ‘या’ चित्रपटातून दीपिकानं केली होती करिअरची सुरूवात

दरम्यान, अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाल्यापासूनच तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. अभिनयाचा वारसा मिळालेली सारा ‘केदारनाथ’ या सिनेमाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. नुकतेच या सिनेमाचे पहिले शेड्यूल पूर्ण करण्यात आले.

२४ वर्षांनंतर एकत्र येणार सनी देओल- डिंपल कपाडिया

‘केदारनाथ’चे दिग्दर्शन अभिषेक कपूर करत असून, त्यानेच सिनेमाचे पहिले शेड्यूल पूर्ण झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवर दिली. सारा आणि सिनेमातील मुख्य अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यासोबतचा एक फोटो त्याने शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 5:10 pm

Web Title: sara ali khan old video singing aashiqui 2 tum hi ho song viral
Next Stories
1 लहानपणी अशी दिसायची दीपिका पदुकोण
2 एप्रिल महिन्यात होणार सोनम- आनंदचे शुभमंगल?
3 नव्या चित्रपटासाठी ऐश्वर्याने घेतले घसघशीत मानधन
Just Now!
X