01 March 2021

News Flash

करिनाला ‘छोटी माँ’ म्हटलेलं आवडणार नाही- सारा

करणप्रमाणे चाहतेही करिना आणि सारामधलं नातं नेमकं कसं आहे हे जाणून घेण्यास उत्सुक होते.

करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नुकतीच सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारानं उपस्थिती लावली. या शोदरम्यान वडील मुलीनं आपल्या कुटुंबाबद्दल आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या. पहिल्यांदाचं एखाद्या टॉक शोमध्ये सहभागी झालेल्या सैफच्या मुलीनं यावेळी सगळ्यांचीच मनं जिंकली. या शोदरम्यान साराला करणनं तिच्या सावत्र आई म्हणजेच करिनाविषयीही प्रश्न विचारले.

करिनाशी लग्नाच्या दिवशी पूर्वाश्रमीची पत्नी अमृताला लिहीलं होतं पत्र- सैफ

करणप्रमाणे चाहतेही या दोघींमधलं नातं नेमकं कसं आहे हे जाणून घेण्यास उत्सुक होते. मात्र मला कधीही करिनासोबत वावरताना संकोचलेपणा वाटला नाही असं सारानं स्पष्ट केलं. नात्यांविषयी माझ्या मनात कधीही संभ्रम नव्हता. करिना माझी सावत्र आई आहे हे मला वडिलांनीच सांगितलं होतं. पण करिनाला माझी चांगली मैत्रीण व्हायचं आहे, तिनं हे फार पूर्वीच मला सांगितलं होतं. ती सावत्र आई असली तरी मी तिला छोटी माँ म्हणून कधीही हाक मारणार नाही, तिला ते अजिबातच आवडणार नाही असंही सारा गंमतीनं म्हणाली.  ती आणि माझे वडील खूप खूश आहेत. माझी आई देखील पूर्वीपेक्षा अधिक खूश आहे असंही सारा म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 5:02 pm

Web Title: sara ali khan on her step mom kareena kapoor khan
Next Stories
1 तैमुरच्या एका फोटोची किंमत माहीत आहे का?
2 शाहरुख, ए. आर. रहमान म्हणतायत ‘जय हिंद!’
3 आलिया म्हणते, आता माझ्या लग्नाची वाट पाहा!
Just Now!
X