07 April 2020

News Flash

सारा अली खानला आहे ‘हा’ आजार; मुलाखतीत केला खुलासा

करण जोहरच्या चॅट शोमध्ये साराने तिच्या आजाराविषयी खुलासा केला.

सारा अली खान

अवघे दोन चित्रपट प्रदर्शित झाले, तरीही तिचं स्टारडम एका मोठ्या कलाकाराइतकंच आहे. ही अभिनेत्री आहे सारा अली खान… सैफ अली खानची मुलगी असतानाही साराने बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. सेलिब्रिटी किड असूनही तिचा हा प्रवास काही सोपा नव्हता. साराचे जुने फोटो पाहून ती भविष्यात ग्लॅमरस अभिनेत्री होईल असं कोणालाच वाटलं नसेल. पण कठोर मेहनत आणि चिकाटीने साराने हे शक्य केलं. करण जोहरच्या चॅट शोमध्ये साराने तिच्या आजाराविषयी खुलासा केला.

कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना साराचं वजन ९६ किलो इतकं होतं. पीसीओडी (PCOD, ‘पॉलीसिस्टिक ओव्हेरीयन डिसीज’) आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे तिला वजन कमी करणं शक्य होत नव्हतं. हा आजार तिला अजूनही असल्याचं साराने सांगितलं. अमेरिकेत पुढील शिक्षण घेत असतानाच साराने तिचं वजन कमी केलं. वर्कआऊट आणि पौष्टिक आहार खाऊन तिने वाढलेलं वजन नियंत्रणात आणलं. चालणे, सायकल चालवणे, ट्रेडमिलवर धावणे याप्रकारचे व्यायाम तिने केले.

आणखी वाचा : कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना नुसरतचं बेधडक उत्तर 

वजन कमी केल्यानंतर सारा जेव्हा भारतात परतली तेव्हा तिची आई अमृता सिंगसुद्धा तिला ओळखू शकली नव्हती. साराच्या सुटकेसवरून अमृताने तिला ओळखलं आणि तिला पाहताच अमृता थक्क झाली. तब्बल ३० किलो वजन तिने कमी केलं होतं. सारा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे जुने फोटो, व्हिडीओ अजूनही पोस्ट करत असते. वजन नियंत्रणात आणण्याचा तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 6:12 pm

Web Title: sara ali khan on her weight loss journey and hormone trouble ssv 92
Next Stories
1 ‘मला हेच करायचे आहे’; कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना नुसरतचं बेधडक उत्तर
2 ‘रात्रीस खेळ चाले 2’ मधील या व्यक्तीचं निधन; अपूर्वा नेमळेकरने वाहिली श्रद्धांजली
3 ‘देवाक काळजी’ या मराठी गाण्याला मिळाले विक्रमी व्ह्यूज; युट्यूबवर गाजतोय व्हिडीओ
Just Now!
X