छोट्या किंवा रुपेरी पडद्यावरील बरेच कलाकार काही अंशी प्रेक्षकांच्या जीवनावर छाप नक्की पाडतात. काहीजणांचा प्रवास प्रेरणादायी असतो तर काही जण आपल्या कामाने इतरांवर प्रभाव पाडतात. असंच एक व्यक्तीमत्त्व सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कमी वयात या अभिनेत्रीने मेहनत, वर्कआऊट करून स्थूलतेचा न्यूनगंड बाळगणाऱ्यांसमोर एक उदाहरण सादर केलं आहे. ही अभिनेत्री आहे सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे.
या थ्रो-बॅक फोटोमध्ये साराला ओळखणंही कठीण आहे. आई अमृतासोबतचा तिचा हा फोटो काही वर्षांपूर्वीचा आहे. सारा आता जरी अत्यंत सुंदर आणि फिट दिसत असली तरी बॉलिवूड पदार्पणापूर्वी तिला अनेकदा स्थूलपणामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. कारण साराचं वजन ९६ किलो इतकं होतं. साराचा हा फोटो पाहून अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेता कार्तिक आर्यननेही ‘ही साराच आहे का’ असा सवाल करत आश्चर्य व्यक्त केला. तर श्रद्धा कपूरने साराची स्तुती केली आहे.
सारा लवकरच ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये झळकणार आहे. यामध्ये ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. कार्तिक आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा ऐकायला मिळतात. त्यानंतर सारा अभिनेता वरुण धवनसोबत ‘कूली नंबर १’च्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 9:54 pm