News Flash

फोटोमधील ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? आज आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री

या अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लेक सारा अली खान हिचा आता स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. बऱ्याचदा ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सारा प्रचंड गोड दिसत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षावर

काही दिवसांपूर्वी सारा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या कुटुंबियांसोबत मालदीवला गेली होती. यावेळचे बरेचसे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पाहून तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. मात्र यावेळी तिने बालपणीचा फोटो शेअर करुन अनेकांची मनं जिंकली आहेत. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला आहे.

 

View this post on Instagram

 

Loved the sun, for many suns

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

 वाचा : अनुष्का उतरणार क्रिकेटच्या मैदानात; साकारणार ‘ही’ भूमिका

दरम्यान, सध्या सारा तिच्या आगामी ‘कुली नंबर 1’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती अभिनेता वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त ती ‘लव आजकल 2’ या चित्रपटात झळकणार आहे. यात कार्तिक आर्यन तिच्यासोबत दिसून येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 12:37 pm

Web Title: sara ali khan share cute childhood photo with camera going viral on social media ssj 93
Next Stories
1 अनुष्का उतरणार क्रिकेटच्या मैदानात; साकारणार ‘ही’ भूमिका
2 Birthday Special : साक्षीला व्हायचं होतं पत्रकार,पण…
3 आवाज कोणाचा?
Just Now!
X