12 July 2020

News Flash

Raksha bandhan 2019 : साराने शेअर केला भावासोबतचा खास फोटो

सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

रक्षाबंधन हा देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधून हे नाते आणखी घट्ट करते. या खास दिना निमित्त बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिचा भाऊ इब्राहिम खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत साराने छान असे कॅप्शनही दिले आहे.

रक्षाबंधन निमित्त साराने भाऊ इब्राहिम खानसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सारा आणि इब्राहिम अत्यंत क्यूट अंदाजात दिसत आहेत. ‘माझ्या छोट्या भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मला आपलं एकत्र खेळणं, तु मला पैसे देणे, मला मिठी मारणे या सर्व गोष्टी आठवते. मी नेहमी तुली त्रास देण्याचे, तुझे जेवण जबरदस्ती जेवण्याचे आणि तुझ्यावर खूप प्रेम करण्याचे वचन देते’ असे कॅप्शन दिले आहे.

साराने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर साराने सोशल मीडियाद्वारे अनेकांची मने जिंकली आहेत. सारा तिचे व्हिडीओ आणि फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. सारा लवकरच ‘लव आजकल २’ आणि ‘कूली नंबर १’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘लव आजकल २’ या चित्रपटात सारासह अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार आहे. तर कुली नंबर १मध्ये सारा वरुण धवनसह दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2019 6:34 pm

Web Title: sara ali khan share special photo of rakshabandhan avb 95
Next Stories
1 अक्षय कुमार ‘या’ अभिनेत्रीसाठी बनला मेकअप आर्टिस्ट
2 अक्षय कुमारने विद्या बालनच्या लगावली कानाखाली, जाणून घ्या कारण
3 Batla House Movie Review : दमदार संवाद, अभिनयासह देशातील सर्वांत चर्चित एन्काऊंटरची कहाणी
Just Now!
X