News Flash

सारा अली खानचा बहिणीसोबतचा फोटो पाहिलात का?

सोशल मिडियावर व्हायरल होतोय फोटो; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सौजन्यः सारा अली खान इन्स्टाग्राम

अभिनेत्री सारा अली खान सोशल मिडियावर कायम ऍक्टीव्ह असते. आपल्या परिवारासोबतचे फोटोज ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. कालच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय आणि त्या फोटोनं नेटकऱ्यांची मने जिंकलीयेत.
साराने आपल्या बहिणीसोबतचा म्हणजे इनायासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत इनाया साराच्या मांडीवर बसलीये. सारा आणि इनाया दोघीही या फोटोत अगदी मनापासून हसताना दिसतायत आणि म्हणूनच या फोटोनं नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

या फोटोला साराने एक गोड कॅप्शनही दिलं आहे. “आम्ही बहिणी बहिणी आमच्या फॅमिली ट्रीची गोड फळं आहोत आणि कायम राहू”, अशा आशयाच्या कॅप्शनसह तिने हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर साराच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
साराच्या मांडीवर बसलेली ही मुलगी म्हणजे साराची बहीण इनाया ही तिची आत्तेबहीण आहे. इनाया ही अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री तसंच साराची आत्या सोहा अली खान यांची मुलगी आहे. काही वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर २०१५ साली या दोघांनी लग्न केलं आणि त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे २०१७ साली इनायाचा जन्म झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Soha (@sakpataudi)

साराच्या घरी नुकताच एक नवा पाहुणाही आला आहे. अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांना काही दिवसांपूर्वीच दुसरा मुलगा झाला आहे. त्यांचा पहिला मुलगा आणि साराचा भाऊ तैमूर कायमच चर्चेत असतो.
सारा अली खानने २०१८ साली ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने सिंबा, लव्ह आज कल, कुली नं १ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तिचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष यांच्यासोबत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 1:09 pm

Web Title: sara ali khan shared photo with her cousin vsk 98
Next Stories
1 ऐन लग्नात अंकुशराव पाटलांची एण्ट्री; निर्विघ्नपणे पार पडेल का प्रियांका-राजवीरचं लग्न?
2 आर्ट एक्झिबिशनमध्ये सलमानच्या चित्राचा समावेश; पोस्ट शेअर करत म्हणाला…
3 अमिताभ यांची प्रकृती अचानक खालावली, सोशल मीडियाद्वारे शस्त्रक्रियेची दिली माहिती
Just Now!
X